Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon : तुम्हाला भाजप, जनसंघ कळायला वेळ लागेल... रामराजेंचा सल्ला

राजेंद्र वाघ

पळशी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचा नामोल्लेख टाळून त्यांचा खरपूस समाचार घेताना 'यडं', 'माजलेला बोकड', अशा शेलक्या शब्दांत एकेरी उल्लेख करत 'तुम्हाला भाजप व जनसंघ कळायला वेळ लागेल', असे विरोधकांना सुनावत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर अक्षरशः बरसले.

कोरेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, सुनील माने, रामभाऊ लेंभे, सारंग पाटील, शहाजी क्षीरसागर, राजकुमार पाटील, कांतीलाल पाटील, शिवाजीराव महाडिक, किशोर बाचल, संजय झंवर, तेजस शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण व म्हसवडचे संबंध संस्थान काळापासून आहेत, असे नमूद करून रामराजे म्हणाले, "एक मला म्हणतंय, 'तू माझ्याकडे का येतो', माझं म्हणणं आहे, की 'तू तरी माझ्याकडे का येतो.' माणचा आमदार मागच्या वेळेला वाचलाय. फक्त दोन हजारांनीच आलाय. निवडणुकीच्या ॲफेडिव्हेटमध्ये माढ्याच्या खासदाराचे शिक्षण 'घरातील मिक्सर, ग्राईंडरच्या मेंटेनन्स करण्याचा डिप्लोमा', असे नमूद आहे.

माझ्यावर नेहमी आरोप होतो, की 'मी भाजपमध्ये चाललोय', पण मी भाजपमध्ये जायला पाहिजे, की नको. त्यावर म्हणतात, की 'आम्ही आहे म्हणून ते येत नाहीत', माझे म्हणणे आहे, 'अरे तुझ्यासारखे किती बघितलेत.' श्रीनिवास पाटील म्हणाले, "मागच्या निवडणुकीत मी म्हणजे शेलारमामा लढला; परंतू शशिकांत शिंदे म्हणजे तानाजी पडला. त्यांच्या पराभवामुळे तेव्हा शरद पवार साताऱ्यात आले नाहीत.

पण, आता साहेब पुन्हा येणार, तुमच्या मतांमुळे शशिकांत शिंदे निवडून येणार आणि मी त्यांना खांद्यावर घेणार." शशिकांत शिंदे म्हणाले, "पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून रिझल्ट द्यावा. अन्यथा मला दुसऱ्या, तिसऱ्या फळीला पुढे आणावे लागेल. बुथ कमिट्यांची कल्पना राष्ट्रवादीने पुढे आणली, तेव्हा सर्वात जास्त बुथ कमिट्या कोरेगाव मतदारसंघानेच केल्या होत्या; परंतु या बुथ कमिट्यांचा उपयोग मी न केल्यामुळेच माझा पराभव झाला.

त्यामुळे आता प्रत्येक गावात पुन्हा बूथ कमिट्या करून त्य सक्षम करायच्या आहेत. पक्ष चालवण्यासाठी माझ्यासह सर्वांनीच काम केले पाहिजे."शशिकांत शिंदे म्हणाले,"आपण आता विरोधात आहोत. सर्वसामान्यांसाठी मोठ मोठी आंदोलने करू. वाईट विचारांच्या रावणाचे दहन करून सिमोल्लंघन करू. मी संघर्ष करणार आणि समोरच्यांना झोपवणारच. माझ्या संघर्षामध्ये पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साथ द्यावी."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT