MIDC : आमदार गोरेंमुळेच म्हसवडची एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरीत.... रामराजे

जयकुमार गोरे MLA Jaykumar Gore यांनी कोरेगावला Koregaon गेलेला प्रकल्प बदलून परत म्हसवडला Mhaswad आणण्याची धमक दाखवावी, असे आव्हान रामराजेंनी Ramraje Naik Nimbalkar यांनी दिले आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Goresarkarnama

सातारा : केंद्र सरकारचा बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर म्हसवडलाच होणार होता. मात्र, तो रद्द करून कोरेगाव येथे नेण्याचा जो काही निर्णय झाला आहे, त्यात माझा कोणताही सहभाग नाही. माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रकल्प स्थलांतरीत झाला आहे, असा गौप्यस्फोट विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

सध्या म्हसवड येथील एमआयडीसीवरून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. यापार्श्वभूमीवर माजी सभापती रामराजेंनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
म्हसवड 'एमआयडीसी'ला माझा विरोध कधीच नव्हता : रामराजे

औद्योगिक कॉरिडॉर हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असून सध्या केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेत आहे. जयकुमार गोरे हे ही भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे गोरे यांनी कोरेगावला गेलेला प्रकल्प बदलून परत म्हसवडला आणण्याची धमक दाखवावी, असे आव्हान रामराजेंनी यांनी दिले आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Satara : सातारा लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून येणार.. जयकुमार गोरे

रामराजे म्हणाले, मुळात म्हसवडमध्ये हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रभाकर देशमुख यांनी प्रामाणिकपणे व कष्ट घेऊन प्रयत्न केले होते. पण त्या अगोदरपासूनच कोरेगावमध्ये हा प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो. परंतू हा प्रकल्प माणमध्ये करायचा आहे, असे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला सांगितले होते.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Maan : म्हसवडची एमआयडीसी कोरेगावला पळविण्याचा घाट...

म्हसवडमध्ये हा प्रकल्प होण्यासाठी प्रभाकर देशमुख आणि अजितदादा यांची भूमिका मोठी होती. अजितदादांनी मला सांगितल्यामुळे हा प्रकल्प कोरेगावमध्ये करण्यासाठीचे प्रयत्न आम्ही केव्हाच सोडून दिले आहेत, असेही श्री. निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com