Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोणाचा कार्यक्रम लावायला गेले आणि त्यांचा कार्यक्रम होऊन गेला

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

अमित आवारी

अहमदनगर - केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाकडून ( ED ) राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना अटक करण्यात आली तर ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या साखर कारखान्याची जमीन जप्त केली आहे. तनपुरे यांनी अहमदनगर येथील एका आंदोलनात 'आम्ही ठरवले तर भाजप नेत्यांचा कार्यक्रम करू शकतो' असे सांगितले होते. त्या नंतर दोनच दिवसांत त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. या संदर्भात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. ( Whose program did they go to and their program was over )

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, मला वाटते हा कोणत्या पक्षाचा विषय नाही. जर एखादी देशात कार्यरत असलेली तपास यंत्रणा काम करत असेल त्यांनी एखाद्या गोष्टीवर कारवाई केली असेल जर ती गोष्ट चुकीची असती तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याचा पर्यायही आहे. देशात व महाराष्ट्रात जिथे भ्रष्टाचार आढळून आला असेल तर त्यावर कारवाई होत असल्यास शेवटी भ्रष्टाचारासाठी वापरले गेलेले पैसे हे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे त्यावर कारवाई होऊन जनतेचे पैसे जनतेला मिळाले पाहिजेत.

ते पुढे म्हणाले की, तनपुरेंवरील कारवाईची बातमी मी काल वाचली मात्र मला त्याविषयी जास्त माहिती नाही. मात्र तपास यंत्रणा कारवाई करत असेल तर तथ्य असल्या शिवाय कारवाई होणार नाही. त्यांना अन्याय वाटत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग खुला आहे. या संदर्भात न्यायालय योग्य तो न्याय करेल.

महाविकास आघाडी टिकेल अथवा नाही यावर भाष्य करण्यासाठी मी फार लहान माणूस आहे. मात्र एखादा मंत्री ज्याच्यावर देशद्रोहाचे व देशद्रोह्यांबरोबर राहिल्याचे आरोप झाले आहेत. जोपर्यंत त्यांचे आरोप निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यांची चौकशी सुरू आहे. देशद्रोहाचे आरोप असूनही पक्ष राजीनामा घेत नाही हीच महाविकास आघाडीचे सत्य आहे. सत्तेसाठी काहीही झाले तरी आम्ही मंत्रीपद जावू देणार नाही. या विश्वासाने महाविकास आघाडीचे मंत्री काम करत आहेत.

ते करेक्ट कार्यक्रम कशा बद्दल म्हणाले त्यामागे त्यांची भावना काय होती हे मी सांगू शकत नाही. कदाचित त्यांची भावना वेगळी असेल. लोकशाहीत मतदार हीच परमेश्वर असतात, असे असताना तुम्ही अशा पद्धतीने भाष्य करत असाल, कार्यक्रम लावू म्हणत असाल तर कोणाचा कार्यक्रम लावायला गेले आणि त्यांचा कार्यक्रम होऊन गेला. हे जनतेच्या मनात असल्याशिवाय होणार नाही.

उगीच काहीतर भाष्य करायचे आणि स्वतःवर जेव्हा कारवाई होते. जनता ठरविते कोणाला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे. कोणाला सत्तेत रहायचा अधिकार नाही. जिल्ह्यात काय विकास चालू आहे. नगर जिल्हा कसा पूर्णपणे मागे गेला आहे. शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे, एवढी दयनिय अवस्था अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आहे, असे खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT