Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहे

अमित आवारी

अहमदनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांची काल ( शुक्रवारी ) भेट झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली. या संदर्भात पत्रकारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना प्रश्न विचारले असता त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर बोचरी टीका केली. The Congress leaders in the state have mortgaged their own intellect

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील सरकार स्थापन झाल्यापासून मी जी भूमिका मांडत आहे. त्याचे काल ( शुक्रवारी ) जे घडले ते उत्तम उदाहरण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व ममता बॅनर्जी यांची भेट झाली. त्यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'युपीएचे विसर्जन झाले आहे.' मला नाही वाटत की, ते शरद पवार यांच्याशी बोलल्याशिवाय एवढे मोठे विधान करतील. कारण, महाराष्ट्रात सत्तेमध्ये राहण्याचे जे साधन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे पवार स्वतः बोलण्या ऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी विधान घातले आहे. एक प्रकारे या विधानामुळे काँग्रेसलाच स्वतःचे विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका ही आमदार विखे पाटलांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सत्तेमध्ये काँग्रेसचे लोक टिकून का आहेत. सत्तेचा मलिदा खाण्यासाठीही मंडळी पक्षाला चिकटून आहेत. पक्षा बद्दल, पक्षाच्या धैय्य धोरणाबद्दल, पक्ष नेतृत्त्वाबद्दल एवढ्या अवमानकारक गोष्टी घडत आहेत. खरंतर त्यांनी सत्तेला लाथमारून आपला स्वाभिमान दाखवायला पाहिजे, महाराष्ट्राला अशी अपेक्षा होती. परंतु मला आश्चर्य वाटले की काँग्रेसच्या दोन नेत्यांनी जी काल पत्रके काढली ती स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या काळातील पत्रके आहेत. पत्रक सुद्धा काढताना स्वतःची अक्कल देखील गहाण ठेवली आहे. जुन्या पत्रकाचा आधार घेतात आहेत. मला वाटते काँग्रेसला एवढी नामुष्की कधी आलेली नाही. हे पाहताना अतिशय दुःख होते, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT