शिर्डी ( अहमदनगर ) : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत पेट्रोल व डिझेल दर कमी झाले आहेत. यावरून सध्या राज्यात भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर आज टीका केली. Radhakrishna Vikhe Patil said, the state should also reduce fuel charges ...
लोणी येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत विखे पाटील व त्यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात विखे पाटील व उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून सामान्य जनतेला दिवाळीत दिलासा दिला. आता महाविकास आघाडी सरकार राज्याचे शुल्क कमी करेल की राज्यातील मंत्री तुपाशी व जनता उपाशी, अशी स्थिती कायम राहाणार, असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम सध्या महाविकास आघाडीचे मंत्री करतात. केंद्र सरकारने जनतेला कोविड लस व धान्य मोफत दिले. कोविडने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. आता राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत द्यावी, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारचे वसुलीवर लक्ष
वीजबिलाची रक्कम उसाच्या रकमेतून वसूल करण्याचा काढलेला फतवा पाहाता राज्य सरकारचे लक्ष फक्त वसुलीवर आहे. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटी परतावा थकविला, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.