pawan rajenimabalkar, omraje nimbalkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Pawanraje Nimbalkar murder case: तब्बल 4 दिवसांनंतर ओम राजेनिंबाळकर भावनविवश होत कॅमेऱ्यासमोर : कोर्टात पोहोचताच संतप्त शिवसैनिकांनीही गाठलं

Pawanraje Nimbalkar murder case News : धाराशिव येथील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाचे वाचन मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. यावेळी याप्रकरणातील महत्त्वाचे दुवे, पुरावे, मुद्यांचा कोर्टातील निकालावेळी वाचन केले जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : धाराशिव येथील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाचे वाचन मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. यावेळी याप्रकरणातील महत्त्वाचे दुवे, पुरावे, मुद्यांचा कोर्टातील निकालावेळी वाचन केले जात आहे. त्यासाठी कोर्टात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर कोर्टात हजर आहेत. त्यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी भावनविवश होत कॅमेऱ्यासमोर मोठे विधान केले आहे. त्याचवेळी मुंबई सत्र न्यायालयाबाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणांत जमले आहेत. ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

कोर्टात पोहोचल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, या 20 वर्षात खूप मोठ्या यातना भोगल्या आहेत. संघर्ष केला. दोन्ही कुटुंबाने यातना भोगल्या आहेत. न्याय देवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे. तब्बल 20 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर न्यायालय या प्रकरणात निकाल देत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला या निकालाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत न्यायालयीन प्रक्रिया होते, त्यानंतर न्यायालयाने आज निकालासाठी तारीख ठरवली. न्याय देवतेकडून न्यायाची अपेक्षा आहे. पद्मसिंह पाटलांना साडेतीन महिन्यात जामीन मिळाला होता. या प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर सध्या बाहेर आहेत. अखेर तब्बल 20 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर न्यायालय या प्रकरणात निकाल देत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला या निकालाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाचे वाचन सुरू आहे. त्यासाठी खासदार ओम राजेनिंबाळकर कोर्टात हजर आहेत. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या कोर्टबाहेर जमले आहेत. ओम राजेनिंबाळकरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांचा निषेध केला जात आहे. गद्दारी केली त्यांना विरोध करणारच अशी घोषणाबाजी शिवसैनिकाकडून केली जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी बंड केल्याचे समोर आले आहे. हे सहा खासदार ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बैठकीला व वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. तर दुसरीकडे ओम राजेनिंबाळकर हे बंडखोर खासदारासोबत असले तरी त्यांची भूमिका अजून जाहीर केलेली नाही. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर मतदारसंघात जाऊन भूमिका ठरविणार असल्याचे जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT