Kirankumar Bakale  sarkarnama
महाराष्ट्र

Kirankumar Bakale : मराठा महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा पीआय किरणकुमार बकालेला मोठा झटका; आयुष्यभर अंगावर खाकी चढवता येणार नाही!

Kirankumar Bakale Dismissed from Police Service : मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पीआय किरणकुमार बकाले यांच्या पोलिस महासंचालकांनी मोठी कारवाई केली आहे.

Roshan More

Kirankumar Bakale Termination : जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ते मराठा समाज आणि मराठा समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. ही क्लिप समोर येताच मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या. बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती.

बकालेवर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत होती. सप्टेंबर 2022 मध्ये ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. दरम्यान, आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपच्या सतत्येची पडताळणी करत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विभागीय चौकशी करत त्याचा अहवाल पोलिस महासंचालकांकडे दिला होता.

चौकशीत बकाले यांना दोषी ठरवून त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. पोलिस महासंचालकांच्यासमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी देखील बकाले यांना देण्यात आली होती. मात्र, त्याने नवीन कोणताही मुद्दा मांडला नाही तसेच त्याच्यावरील आरोपांचा प्रतिवाद देखील करता आला नाही. अखेर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बकाले याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश काढले.

सेवेतून केले होते निलंबित

किरणकुमार बकाले याचा मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर खातेअंतर्गत त्याची चौकशी देखील सुरू होती. दरम्यान, मराठा समाजातील संघटनांकडून फक्त निलंबन नको तर सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

संभाजी ब्रिगेड आक्रमक

किरणकुमार बकालेविरोधात कारवाईसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली होती. पिंपरी-चिंचवडचे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी बकाले याला सेवेतून बडतर्फ करावे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. तसेच कारवाई न झाल्यास जाणीवपूर्वण मराठा समाजाचा अपमान करणाऱ्यालाला मनोविकृतीला त्यांच्याच भाषेत उत्तर देखील समाजात असल्याचा इशारा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT