Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे मंत्रिपद फिक्स! 'या' मंत्र्याला मिळणार नारळ, तानाजी सावंतांनाही गुड न्यूज!

Dhananjay Munde Tanaji Sawant Cabinet Expansion : पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्याला राजीनामा दावा लागण्याची शक्यता आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आले. त्यानंतर मुंडे यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला होता. राजीनाम्याच्या सहा महिन्यानंतर आपल्याला रिकामे ठेवू नका, हाताला काम द्या,जबादारी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद फिक्स असून स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार असल्याचे वृत्त एका वर्तमान पत्राने दिले आहे. विश्वसनीय सुत्रांचा हवाला देताना पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून मुंडेंना मंत्रिपद मिळणार असल्याचे या वृत्तात म्हणण्यात आले आहे.

धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात एन्ट्री होत असताना कुठल्या मंत्राला नारळ मिळणार याची देखील चर्चा आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेत मुंडेंना संधी दिली जाईल, असे देखील विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत कोणीही अधिकृत वक्तव्य केले नाही.

Dhananjay Munde
Bachchu Kadu On BJP: बच्चू कडूंनी भाजप मंत्र्यांना खडसावलं; म्हणाले, 'चांगले बोलता येत नसेल तर किमान...'

तानाजी सावंत यांना संधी

तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमाला तसेच विधीमंडळ अधिवेशनाला देखील ते गैरहजर होते. त्यामुळे सावंत यांच्या नाराजीच्या चर्चा वाढल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना मुंबईत अचानक बोलावून घेतले होते. त्यामुळे सावंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची सांगितले जात आहे.

Dhananjay Munde
Marathwada Rain Flood: पावसाचा तडाखा बसलेल्या मराठवाड्यासाठी अजितदादांनंतर आता एकनाथ शिंदेंचाही सर्वात मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com