Prakash Ambedkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : मोदी हिंदूविरोधी की, मुस्लिमविरोधी ? आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले....

Sachin Deshpande

Akola Lok Sabha Election 2024 : देशातील मुस्लिम समाजाची मोठी लढाई आहे. त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली नाही. पण, काँग्रेस पक्षाने काही जागा मुस्लिमांना देण्याची गरज होती. महाराष्ट्रात काँग्रेस व महाविकास आघाडीने एकाही मुस्लिमाला तिकीट दिले नाही. काँग्रेसने मुस्लिमांना साधी उमेदवारी दिली नाही. मुस्लिमांच्या हक्कासाठी देशातील सेक्युलर शक्तीने समोर येण्याची गरज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचार सभांचा धडाका संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. मूर्तिजापूर येथील सभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी सगळ्यात मोठे हप्तेखोर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इनकम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातले का ? असा प्रश्न या वेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. किती लोकांवर थेट कारवाई झाली आणि ते जेलमध्ये गेले याची नावे सरकारने जाहीर करण्याचे आव्हान आंबेडकर यांनी केले. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हापासून किती भारतीय कुटुंबांनी देशही सोडला आणि भारताचे नागरिकत्वही सोडले, हे तुम्ही गुगलवर चेक करू शकता. याबाबतचे सर्व आकडे मिळतील. 2014 पासून 17 लाख हिंदू कुटुंब ज्यांची संपत्ती 50 कोटींपेक्षा जास्त आहे, त्यांना नामोहरम करण्यात आले. बेजार करण्यात आले. मानसिक त्रास देण्यात आला आणि म्हणून त्यांनी कंटाळून भारतीय नागरिकत्व सोडले आणि परदेशाचे नागरिकत्व घेतले, असा दावा आंबेडकरांकडून करण्यात आला आहे.

देशातील 17 लाख हिंदू कुटुंब देश सोडून बाहेर गेले. ही माहिती खोटी आहे का हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना करण्यात आले आहे. पंतप्रधानांचे कार्यालय मानवतेचे कार्यालय न राहता हे आता वसुलीचे कार्यालय झाले आहे, हे आपण लक्षात घ्या. भाजप आणि नरेंद्र मोदी मुसलमानाच्या विरोधात नाहीत. पण ते दाखवण्यासाठी आज मुसलमानाच्या विरोधात आहेत. पण खऱ्या अर्थाने मोदी इथल्या हिंदूच्या विरोधात आहेत, असा आरोप या वेळी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला.

मुस्लिमांच्या घुसखोरीवर काय म्हणाले आंबेडकर

भारतीय मुस्लिम घुसखोर नाही. ते आपल्या विविध, बहुवचन आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत, आम्ही सर्व आहोत. आरएसएस - भाजप यांच्या भेदभावपूर्ण धोरणांमुळे भारतातील मुस्लिमांना हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न होत आहे, तर या सर्व परिस्थितीत काँग्रेस भयभीत असून, त्यांनी चुप्पी साधली आहे. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सीएए- एनआरसी या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका अस्पष्ट असल्याचे वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. सीएए- एनआरसी हे कार्यकायदेशीर आहे. असंवैधानिक आहे. संविधानानुसार ज्याचा या देशात जन्म झाला तो भारतीय नागरिक असून, त्याला कुठलेही प्रूफ देण्याची गरज नसल्याचे आंबेडकर म्हणाले. पण, आज मोदी सांगतेय की कागद आणा नाही तर जेलमध्ये पाठविण्याचा त्यांचा इरादा असल्याचे आंबेडकर म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT