PM Narendra Modi meeting with shivsena MP News Sarkarnama
महाराष्ट्र

ShivSena News : PM मोदींसोबत शिवसेनेच्या 6 खासदारांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'; ओम राजेनिंबाळकरांकडून घेतली खास माहिती

PM Narendra Modi meeting with shivsena MP News : सात खासदारांशी संवाद साधताना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Sachin Waghmare

New Dehli News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या 6 खासदारांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांच्यासोबतच्या ब्रेकफास्ट बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यांनी प्रत्येक खासदाराची स्वतंत्रपणे विचारपूस केली. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. याचवेळी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या योगाभ्यासाबद्दल जाणून घेतल्याचे माहिती आहे. दरम्यान, या बैठकीतील नेमक्या चर्चेची आणि मोदींनी खासदारांना दिलेल्या सूचनांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सोबत पार पडलेल्या या ब्रेकफास्ट बैठकीत मतदारसंघात कोणतीही विकासकामे प्रलंबित असतील किंवा केंद्र सरकारशी संबंधित कामांसाठी अडचणी येत असतील, तर थेट पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधा, त्याशिवाय येत्या काळात मतदारसंघातील विकास कामांना गती द्या, सत्तेचा उपयोग करून जनतेची कामे मार्गी लावा, अशा सूचना मोदींनी या खासदारांना दिल्याचे समजते.

मतदारसंघाचा आणि राज्याचा विकास हेच प्राथमिक ध्येय ठेवा. जेव्हा राज्यातील विकासकामे वेगाने पूर्ण होतील, तेव्हाच देशाची प्रगती होईल, असा मूलमंत्र खासदारांना दिला. एनडीएमध्ये प्रवेश केलेल्या खासदारांनी काळजी करण्याची गरज नाही. एनडीए हे एक कुटुंब आहे आणि मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. प्रत्येकाला सन्मान आणि कामाची समान संधी दिली जाईल, अशा शब्दांत पीएम मोदींनी आश्वस्त केले.

या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न, विकासकामे आणि केंद्राच्या माध्यमातून मार्गी लावता येणाऱ्या कामांबाबत चर्चा झाली. प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेऊन त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक असलेली सर्व ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पीएम मोदींनी दिले असल्याचे समजते. संबंधित खासदारांशी स्वतंत्र संवाद साधल्याचेही सूत्रांनी सांगितले.

या बैठकीस शिवसेनेचे खासदार संजय जाधव, ओम राजेनिंबाळकर, संजय दीना पाटील, नागेश आष्टीकर, संजय देशमुख व भाऊसाहेब वाकचोरे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या सूचनांमुळे शिवसेनेच्या खासदारांकडून आगामी काळात मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना अधिक वेग देण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT