Maharashtra Politics : मोदी सरकारचा सलग तिसरा शपथविधी सोहळा रविवारी राष्ट्रपती भवनात दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 72 जणांनी शपथ घेतली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव होऊनही मोदींच्या मंत्रिमंडळात मानाचं पान मिळालं आहे, हे विशेष.
लोकसभा निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. महायुतीने मिशन 45 चा नारा दिला होता. पण त्याच्या निम्म्याही जागा मिळाल्या नाहीत. भाजपला 9, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली.
दुसरीकडे मागील निवडणुकीत केवळ एक जागा मिळालेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार विजयी झाले. तर पक्षफुटीनंतर दयनीय स्थिती झालेले शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागांवर विजय मिळाला.
आघाडीने युतीला पराभवाची धूळ चारली असली तर मोदींच्या मंत्रिमंडळात युतीला पुर्वीप्रमाणेच मान देण्यात आला आहे. 2014 व 2019 मध्ये महायुतीला प्रत्येकी 41 जागा मिळाल्या होत्या. मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे आणि अनंत गिते हे कॅबिनेट मंत्री होते. तर प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे राज्यमंत्री होते.
मोदींच्या दुसऱ्यामध्ये गडकरींसह अरविंद सावंत व प्रकाश जावडेकर कॅबिनेट मंत्री तर रावसाहेब दानवे, रामदास आठवले आणि संजय धोत्रे हे राज्यमंत्री होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नारायण राणे, कपिल पाटील आणि भारती पवार यांना संधी मिळाली. दोन्ही टर्ममध्ये किमान सहा मंत्री होते.
2024 मध्ये मात्र महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रिपदं आली आहेत. राष्ट्रवादीने राज्यमंत्रिपदाची ऑफर स्वीकारली असती तर हा आकडा सातवर गेला असता. 17 खासदारांमध्ये महाराष्ट्राला सात मंत्रिपदे मिळाली असती. त्यामुळे राज्यात एनडीएला फटका बसला असला तरी मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रात महाराष्ट्राला मानाचे पान दिले असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.