PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठं ‘गिफ्ट’

Narendra Modi Oath Ceremony Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 72 जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही तासांतच मोदींनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये काही तासांतच शेतकऱ्यांना पहिलं मोठं गिफ्ट दिलं आहे. पदाचा कार्यभार स्वीकारताच मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 20 हजार कोटी जमा केले.

पंतप्रधान मोदींनी रविवारी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या फाईलवर सही केली. ही फाईल पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची होती. मोदींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार कोटी जमा करण्यात आले.

फाईलवर सही केल्यानंतर मोदी म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार कटिबध्द आहे. त्यामुळे पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकरी हिताच्या फाईलवर पहिली सही केली. पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये आणखी काम करायचे आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींसह रविवारी 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये 30 कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जणांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे मंत्रिमंडळात असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com