Gopichand Padalkar and Jitendra Awhad lock horns over police action against Nitin Deshmukh and Rishikesh Takle. sarkarnama
महाराष्ट्र

Gopichand Padalka vs Jitendra Awhad : पडळकर-आव्हाड राड्यात मोठा ट्विस्ट, मध्यरात्री नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतले ताब्यात, पडळकरांचे समर्थक...!

Nitin Deshmukh Rishikesh Takle Arrest : पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Roshan More

Nitin Deshmukh Arrest : विधानभवन परिसरात बुधवारी मोठा राडा झाला. या राड्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केली आहे. मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांसोबत गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. देशमुख यांना मारहाण करणारा ऋषिकेश टकले याला देखील अटक करण्यात आली आहे.

नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्याच्या आधी विधानभवन गेटवर पोलिस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात हायहोल्टेज ड्रामा झाला, आव्हाड यांना थेट पोलिसांनी फरफटत बाजुला केले. पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांनी रात्रभर आंदोलन केले. आमदार रोहित पवार हे देखील त्यांच्यासोबत होते.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, विधीमंडळ आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला करुन त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यासोबत सरकारविरोधात आंदोलन केले. आरोपीला मोकाट सोडून पिडीताला अटक करणं हे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून सत्तेतून आलेली ही मस्ती आहे. पण सरकारच्या या जुलमाविरोधात आम्ही लढत राहू!

जितेंद्र आव्हाड आक्रमक

पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर, असे ट्विट करत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT