Awhad-Padalkar Hassle: आव्हाड-पडळकर वादाची पहिली ठिणगी ते विधानभवन लॉबीत हाणामारी; जाणून घ्या संपूर्ण टाइमलाईन

Awhad-Padalkar Hassle Timeline : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज विधानभवनाच्या लॉबीमध्ये तुफान राडा झाला.
Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Published on
Updated on

Awhad-Padalkar Hassle Timeline : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज विधानभवनाच्या लॉबीमध्ये तुफान राडा झाला. कपडे फाटेपर्यंत पडळकरांच्या कार्यकर्त्यानं आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांच्याशी झटापट झाली.

पण पडळकरांचे समर्थक हा हल्ला आपल्यावरच करणार होते, पण मी त्यांच्या तावडीत सापडलो नाही त्यामुळं त्यांनी माझ्या कार्यकर्त्याला टार्गेट केलं असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना केला. पण हा दोघांमधला वाद काही दिवसांपूर्वी सुरु झाला, नेमकी याची सुरुवात कशी झाली? याची संपूर्ण टाइमलाईन जाणून घेऊयात.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Vidhan Bhavan Hassle: विधिमंडळाच्या लॉबीतील हाणामारी! आव्हाड प्रचंड संतापले, पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; नेमकं काय म्हणालेत दोघेही?

ख्रिश्चन धर्मगुरुंवर पडळकरांची टिप्पणी

आपल्याकडं बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीस ठेवले जातात त्याप्रमाणं धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचं बक्षीस दुसऱ्याला मारेल त्याला चार लाखांचं, तिसऱ्याला मारेल त्याला तीन लाखांचं बक्षीस. तर जो कोणी पादरीचा सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे असं आक्षेपार्ह विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका महिन्यापूर्वी केलं होतं.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Vidhan Bhavan : विधानभवनाचं पावित्र्य भंग! लॉबीमध्ये पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांचे कपडेही फाडले

आव्हाडांकडून पडळकरांची तक्रार

पडळकरांच्या या विधानावर आक्षेप घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडं तक्रार करत त्यांच्यावर कारावाईची मागणी केली होती.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Sandipan Bhumre: बोगस नवाब...हिबानामा अन् 124 कोटींचा जमीन घोटाळा! भुमरे पितापुत्रांवर जलील यांचा गंभीर आरोप; थेट कागदपत्रंच आणली समोर

पडळकरांनी अर्बन नक्षल संबोधलं

त्यांच्या या मागणीनंतर पडळकरांनी त्यांना 'अर्बन नक्षल' असं संबोधलं होतं. तसंच 'मुसलमानांचा एक्स' अशा शब्दांत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता, असा दावा आव्हाड यांनी केला होता.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Prakash Mahajan: "मनसेमध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेणारी व्यवस्था नाही"; महाजन प्रकरणानंतर पक्ष काय घेणार निर्णय?

आव्हाडांनी मंगळसूत्र चोर म्हणत डिवचलं

त्यानंतर काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जात असताना 'मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..' अशा घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या होत्या. आव्हाड यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडले होते.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Nagpur Politics: तरुण तुर्कांची होणार जिल्हा परिषदेत एन्ट्री! अनेक नेत्यांचे चिरंजीव लागले कामाला; कोण कोण आहे रांगेत?

आव्हाड-पडळकरामध्ये प्रत्यक्ष वाद

यानंतर दोन दिवसांपूर्वी विधानभवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये प्रत्यक्षात वाद झाला. त्यानंतर आज आव्हाडांना पडळकरांच्या कार्यकर्त्याकडून सोशल मिडीयावरून मेसेजद्वारे शिविगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचे स्क्रीनशॉट शेअर करत आव्हाडांनी ट्विट केलं आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टॅग केलं.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
MLA Supporter Clash : विधीमंडळातील हाणामारीवर मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका; फडणवीसांनी कडक कारवाईची कोणाला केली विनंती

आव्हाडांचं ट्विट अन् कार्यकर्ते भिडले

दुपारी आव्हाडांनी हे ट्विट केल्यानंतर अवघ्या काही तासांतच साधारण साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास विधानभवनाच्या लॉबीमध्ये आव्हाडा आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पडळकरांचा कार्यकर्ता हा थेट आव्हाडांचा समर्थक नितीन देशमुख यांच्या अंगावर धावून गेला त्यानंतर त्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले. या झटापटीत देशमुख यांचा शर्टही फाटला.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Ambadas Danve On Honey trap : राज्यातील काही नेते अन् प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात!

लाजीरवाण्या घटनेची चौकशी

अशा प्रकारे जनतेचं व्यासपीठ असलेल्या आणि लोकशाहीचं मंदिर मानल्या जाणाऱ्या विधानभवनाच्या आवारातील हाणामारीचं किंवा गुंडगिरीचं प्रदर्शन अत्यंत लाजीरवाणं होतं. या हाणामारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारात आलेच कसे? त्यांना पास कोणी दिले? हल्लेखोर हे मकोकाचे आरोपी असून त्यांना विधानभवनात प्रवेश मिळालाच कसा? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com