Raj Thackeray News
Raj Thackeray News Sarkarnama
महाराष्ट्र

राजकारण तापलं; राहुल गांधींविरोधात मनसे मैदानात, राज ठाकरेंचे महत्वाचे आदेश

Ganesh Thombare

Raj Thackeray News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आता मनसे देखील मैदानात उतरली आहे. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत भारत जोडो यात्रेत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक झालीय. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत राहुल गांधींनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. या सभेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काही विधानं केली. त्याच मुद्दयावरून काल देवेंद्र फडणवीसही काँग्रेसच्याविरोधात आक्रमक झाले. तर आता मनसेही गांधींच्या विरोधात मैदानात उतरली आहे.

काँग्रेसचे नेते सावरकरांबाबत रोज खोटं सांगतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) तर सावरकरांबाबत रोज खोटं बोलतायेत. पण महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही, राहुल गांधींना स्वांतत्र्यवीर सावरकरांबाबत स देखील माहीत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं होतं. त्यानंतर सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेल्या मताशी आम्ही सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेही म्हणालेत. तर मनसेही काँग्रेसविरोधात आक्रमक झालीय.

राहुल गांधींच्या मताशी आम्ही सहमत नाही : उद्धव ठाकरे

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाशी आम्ही देखील सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) म्हटलंय. गांधी जे बोलले ते चुकीचं आहे. सावरकरांबाबत आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला लगावत आता भाजप सत्तेत आहे मग सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजप आणि मनसे काँग्रेसविरोधात आक्रमक झालेत. एवढंच नव्हे तर शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी तर भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT