Rahul Gandhi : सावरकरांचा माफीनामा राहुल गांधींनी वाचून दाखवला ; फडणवीस, भागवतांनाही टोमणा

Bharat Jodo Yatra rahul gandhi : "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे," असे राहुल गांधी म्हणाले.

Bharat Jodo Yatra rahul gandhi
Bharat Jodo Yatra rahul gandhi sarkarnama
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानाबाबत वाद पेटला आहे. गांधींच्या विरोधात शिंदे गट आणि भाजपचे आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल यांचा निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या अकोला येथे आहे. (Bharat Jodo Yatra rahul gandhi news update)

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सावकरांनी इंग्रज सरकारला लिहिलेलं पत्र माध्यमासमोर वाचून दाखवलं.

"हे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघलाचक मोहन भागवत यांनाही दाखवा," असा टोला राहुल गांधी यावेळी हाणला. "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांना माफीचे पत्र लिहिले होते, यावर मी ठाम आहे," असे राहुल गांधी म्हणाले.


Bharat Jodo Yatra rahul gandhi
Ranjit Savarkar : स्वातंत्र्यवीरांचे नातू राहुल गांधींविरोधात पोलिसांत जाणार

"आमची यात्रा रोखायची असेल तर रोखा. काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटलं ही यात्रा रोखली पाहिजे तर त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करावा, असं आव्हानच गांधींनी दिलं. आमचं काम भारत जोडोचं आहे. आम्हाला भारत जोडायचा आहे. हे आम्हाला करायचं आहे. आम्ही इतर गोष्टींचा विचार करत नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ'..

राहुल गांधी म्हणाले, "पत्रात सावरकरांनी इंग्रजांना उद्देशून असे लिहिले आहे की, 'सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ'. या पत्राच्या खाली वीर सावरकर यांची स्वाक्षरीही आहे. ही स्वाक्षरी केल्यानंतर सावरकरांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनाही अशी सही करण्यास सांगितले होते. असे म्हणून सावरकरांनी सर्व देशासोबत तसेच तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात असलेल्या काँग्रेसशी विश्वासघात केला होता,"

दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात ते पोलिसात तक्रार देणार आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com