IAS Pooja khedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Pooja Khedkar : पूजा खेडकरांना अटकेची भीती? जामिनासाठी दिल्लीत धावाधाव

Pradeep Pendhare

Mumbai News : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना अटकेची भीती वाटत असल्याने त्यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर आजच सुनावणी होणार आहे.

अतिरीक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांच्यासमोर अर्ज असून, त्यावर दुपारी सुनावणी होईल. IAS पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे फसवणुकीचे कारनामे समोर आले. यानंतर पूजा खेडकरसह त्यांच्या आईवडिलांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले. पूजा खेडकरवर दिल्लीत UPSC गुन्हा दाखल झाल्यापासून नाॅटरिचेबल आहेत.

UPSC होण्यासाठी IAS पूजा खेडकर यांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दिल्लीत दाखल झाला. UPSC च्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा दाखल होताच दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावली. नाव बदलून UPSC ची परीक्षा देणे, आई आणि वडिलांचे नाव बदलून कागदपत्र देणे, सही बदलणे, पत्ता बदलणे, अशा पद्धतीचे कागदपत्र UPSC ला दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. दिव्यांग कायदा, फेरफार, फसवणूक, आयटी अ‍ॅक्टनुसार दिल्लीत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

IAS पूजा खेडकर यांनी दिव्यांग कोट्यातून UPSC परीक्षा दिला. हे दिव्यांग प्रमाणपत्र देखील वादात आहेत. त्याची देखील चौकशी सुरू आहे. पूजा खेडकर यांना यापूर्वी मसुरीमधील लालबहादूर शास्त्री अकादमीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. 23 जुलैपर्यंत मसुरी अकादमी हजर राहण्याचा आदेश पूजा खेडकर यांना देण्यात आला होता.

परंतु पूजा खेडकर या तिथं पोचल्याच नाहीत. मसुली अकादमीत हजर राहण्याचा आदेश येताच पूजा खेडकर या नाॅट रिचेबल झाल्या. पुणे पोलिसांनी देखील त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना होत्या. पुणे पोलिसांनी त्यासाठी दोन वेळा नोटीस बजावल्या. परंतु त्या तिथे देखील हजर राहिल्या नाहीत.

पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाल्या, तेव्हा त्या वाशिम येथे प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. गुन्हा दाखल होताच, त्यांनी वाशिम सोडलं. तत्पूर्वी त्या 72 तास वाशिम गेस्टहाऊसमध्ये होत्या. तिथेच त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले होते. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात पूजा खेडकर यांनी तक्रार दिली. त्यानंतर तेथून त्या नागपूर इथं रवाना झाल्याचे सांगितले गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT