Rohit Pawar on AJit Pawar : ''20-22 जागा जर सन्मानजनक असतील, तर मग..' रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा!

Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार म्हणजे येणार, असा विश्वासही व्यक्त केला.
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज(रविवारी) मुंबईच्या दिशेने जाता जाता पिंपरी चिंचवड शहरात माध्यम प्रतिनिधींशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून मागील काही दिवसांमंध्ये शरद पवार गटात नेत्यांचे प्रवेश होत आहेत. यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

काल बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला, त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे देखील शरद पवारांसोबत हडपसरमध्ये एकाच मंचावर दिसले. यावरून चेतन तुपे संपर्कात आहेत का? यावर बोलताना रोहित पवार(Rohit Pawar) म्हणाले, 'त्यांनी एकाच मंचावर का लावली, कशामुळे ते आले. निवडणूक अवघड जातेय असं कुठंतरी आता जाणवायला लागलं असेल.

या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्यला कळतील. पण मी एकच सांगतो शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती, की आपल्याला लोकसभा लढायची ही मनापासून लढायची. पण विधानसभा जिंकायची आहे. त्यामुळे कोण येईल, कोण नाही याच्यापेक्षा ही गोष्ट माहीत आहे की, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार म्हणजे येणार.'

Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar Politics: अजित पवार करणार शरद पवारांच्या बालेकिल्ल्यातून प्रचाराची सुरवात

'जेव्हा आपण विचार बदलतो, साहेबांना सोडतो तेव्हा लोक सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला टोपी घालतात. हे कुठंतरी या लोकसभेत आपण बघितलेलं आहे.' असं म्हणत अजित पवारांना(Ajit Pawar) त्यांनी टोलाही लगावला.

Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar News : महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचे मोठं विधान; म्हणाले,...

याशिवाय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला(NCP) विधानसभेसाठी सन्मानजनक जागा मिळतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. त्यावर रोहित पवारांनी म्हटलं आहे की, '20-22 जागा जर सन्मानजनक असतील, तर मग तो त्यांचा विषय आहे. बघूयात विधानसभेला काय होतंय. त्यांना किती जागा मिळतील यापेक्षा आम्ही किती जागा लढणार आहोत आणि आम्हाला काही झालं तरी लोकशाहीच्या हितासाठी महाराष्ट्राता महाविकास आघाडीचं सरकार आणायचंच आहे. असा विचार आमचा आहे आणि आमच्या नेत्यांचाही आहे आणि सामान्य नागरिकांचा सुद्धा आहे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com