Pradeep Purnekar | Thane Crime Case Sarkarnama
महाराष्ट्र

Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट : शूटर्सपैकी एकाला गोळी लागली? पोलिसांना घटनास्थळी सापडले महत्त्वाचे पुरावे

Pradeep Purnekar case takes a new turn as police investigate: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एकाला गोळी लागली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एसआयटीने कार्यालयाची तपासणी करून काडतुसे आणि महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले.

Hrishikesh Nalagune

Pradeep Purnekar investigation: प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या वेळी झाडलेली एखादी गोळी आरोपीलाही लागली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे नवा द्विस्ट समोर येत आहे, मात्र गोळी नेमकी कोणाला लागली, त्या जखमी झालेल्याने कुठे उपचार घेतले. या संदर्भात ठाणे-मुंबई तसेच आजूबाजूच्या रुग्णालयातील नोंदी तपासण्याचे कामही पोलिसांकडून केले जात आहे.

पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करताना झाडलेली एखादी गोळी भिंतीवर किंवा अन्य ठिकाणी आदळून 'रिव्हर्स' होऊन आरोपीला लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या आरोपींच्या हालचालींबरोबरच गोळी लागून जखमी झालेल्या व्यक्तीने कोणत्या रुग्णालयात उपचार घेतले का, याचीही माहिती घेतली जात आहे. आरोपींनी नेमक्या किती गोळ्या झाडल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एसआयटीकडून पुरावे संकलित

पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तीन दिवसांपासून बंद असलेले त्यांचे ठाण्यातील कार्यालय शुक्रवारी एसआयटी पथकाच्या उपस्थितीत उघडण्यात आले. गुरुवारी एसआयटी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पथकाने कार्यालयाची तपासणी करून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित केले.

कार्यालयात हत्येनंतर रक्ताचे डाग तसेच अन्य खुणा आढळल्या. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करताना गोळीबारात वापरण्यात आलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पुराव्यांच्या आधारे हत्येचा तपास पुढे नेण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT