Praful Patel Sarkarnama
महाराष्ट्र

Praful Patel News : विधानसभेला राज्यातील चित्र वेगळे असेल; प्रफुल्ल पटेल यांचे मोठे विधान

Sachin Waghmare

Ncp News : विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने सध्या तयारी जॊरात सुरु आहे. राज्यातील काही पक्षाकडून यात्रा काढून नागिरकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच गेल्या चार दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेला सर्वस्थरातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यातच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची लोकप्रियता, त्यांनी केलेले काम हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता लोकसभेच्या तुलनेत आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील चित्र वेगळे असेल, असा दावा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel ) यांनी केला आहे. (Praful Patel News )

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना पटेल यांनी महायुती सरकारने केलेल्या कामांची प्रशंसा केली. लोकसभेच्या काळातील फेक नेरेटीव्ह नागरिकांना समजला आहे. लोकही आता बोलायला लागले आहेत. आमचे चुकले होते, देशात आणि राज्यात दोन्ही सरकारमध्ये सुसंवाद राहिला तर त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात लक्ष देऊन विकासासाठी सरकारमध्ये असल्यामुळे काम करून दाखवले आहे. सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक मतदारसंघातील सामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिक समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात रक्षाबंधनला पहिला हप्ता लाडकी बहीण योजनेचा आमच्या सगळ्या बहिणींना मिळणार आहे. महाराष्ट्रात अंदाजे अडीच कोटी महिलांना त्याचा फायदा होईल. एक जुलैपासून कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही. योजनेमुळे आपल्या लाडक्या भावाला धन्यवाद द्यायला असंख्य बहिणी रस्त्यावर उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सरकारमुळे महिलांना शिक्षण फ्री मिळणार, महिला उत्कृष्ट नागरिक म्हणून येत्या काळात काम करतील. लोकसभेच्या काळात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. कांदा, कापूस, मका या शेतकऱ्यांना फायदा होईल, आम्ही दिलासा देतोय. शेतकऱ्यांचे वीज बिल माप होत आहे. सोलर पॉवरला मोठी मागणी आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा अद्याप निर्णय नाही

जागावाटपाचा कोणताही निर्णय झाला नाही, एकत्र लढाईचा हा निर्णय ठरला आहे. स्वाभाविकपणे तीन पक्षात जागावाटप करताना थोडा वेळ लागत आहे. आम्ही महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढणार आहोत. भाजपचे जास्त आमदार असल्यामुळे आमच्यापेक्षा त्यांच्या जागा थोड्या जास्त असणार आहेत. आमच्या जागा वाटपात कोणतीही भांडण होणार नाही असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT