Praful Patel  Sarkarnama
महाराष्ट्र

Praful Patel : दिल्ली ते महाराष्ट्र ‘पॉवर गेम’ सुरू! मोदींपासून फडणवीसांपर्यंत ‘पटेल कनेक्शन’! अचानक बैठकींमागे नेमकं काय शिजतंय?

Praful Patel Meets Modi & Fadnavis After Ajit Pawar Demise Big Shift in NCP Politics : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांबरोबर वावर वाढलेला दिसतो आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics latest : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदावर निवड होताच, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा भाजपचे पियुष गोयल यांनी केला.

यावर प्रफुल पटेल यांनी, मी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाही, स्पष्टीकरण दिले आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबरोबर दिसले. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर प्रफुल पटेल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महाराष्ट्रात दिसले. प्रफुल पटेल यांच्या या राजकीय हालचालींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचे पियूष गोयल यांनी अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल असल्याचे एका वृत्तसंस्थेला मुलाखतीत सांगितले. यानंतर एकच गदारोळ झाला. राज्याच्या राजकारणात यावरून, एकच राजकीय धुरळा उडाला. प्रफुल पटेल यांनी यावर स्पष्टीकरण देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. पंतप्रधानांना पुष्पहार घालण्यात प्रफुल पटेल पुढे दिसले. तेवढ्यात पियूष गोयल यांनी यावर खुलासा करत, राष्ट्रवादी अध्यक्षपदावर केलेल्या विधानावरून माघार घेतली.

नाशिक इथल्या जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचीही उपस्थिती होती. जैनमुनींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे (NCP) खासदार प्रफुल पटेल यांनी दर्शन घेतलं. प्रफुल पटेल यांनी णमोकार तीर्थक्षेत्रासाठी राज्य सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीपूर्वी केंद्रातील अर्थसंकल्प अधिवेशनाला प्रफुल पटेल यांनी दिल्लीला हजेरी लावली. तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवारांच्या पश्चात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, तसंच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतही जोरदार चर्चा रंगत आहेत. यावरून चर्चा रंगत असतानाच, प्रफुल पटेलांची ही भेट चर्चेत आली.

राज्याच्या राजकारणात प्रफुल पटेल यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत येताच, जोरदार गदारोळ झाला. प्रफुल पटेल यांच्या नावाला अप्रत्यक्षपणे विरोध सुरू झाला. या गदारोळात प्रफुल पटेल यांनी अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नसल्याचे सांगत, चर्चांना पूर्णविराम दिला.

मोदींचा सत्कार, पटेलांचा सूचक संकेत

याशिवाय दिल्लीतील एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार प्रफुल पटेल यांनी केला. पटेल यांनी स्वतः पुष्पहार घेऊन मोदी यांच्या गळ्यात घातला. अध्यक्षपदाच्या रेस नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पटेल यांनी थेट मोदींचा सत्कार करण्याची ही कृती, पटेलांचा सूचक राजकीय संदेश असल्याचे मानले जात आहे.

दिल्लीच्या राजकारणात पटेल पाॅवरफूल

प्रफुल पटेल यांचे दिल्लीतील राजकारणात मोठे प्रस्थ आहे. शरद पवार यांनी त्याचा खुबीनं वापर केला. अजितदादांनी देखील प्रफुल पटेल यांना दिल्लीच्या राजकारणाचं नेतृत्व दिलं. दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत प्रफुल पटेल यांचा राजकीय वावर अलगद आहे. आगामी काळात राष्ट्रवादीत राहून तसाच राहणार का? की वेगळी काही रणनीती प्रफुल पटेल राबवणार, याची चर्चा आहे.

पटेलांचा भाजपमधील वावर

यातच दिल्लीत मोदी, शहा यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात थेट फडणवीसांबरोबर पटेल दिसत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांबरोबर पटेल यांचा वावर पुन्हा चर्चेचा विषय ठरू पाहात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT