

NCP merger talks : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्यावरून वेगवेगळे आखाडे बांधले जात आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मित्रपक्ष सावध झाले आहेत. केंद्रात काँग्रेस देखील शरद पवार यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहेत. अजित पवार राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाच्या मुद्यावर, प्रतिक्रिया येत आहे.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून, यावर बोलण्यासाठी प्रमुख तिघांवर जबाबदारी देण्यात आली होती. पवार कुटुंबातील या दुःखाच्या काळात, शांततेची भूमिका घेतली. आमदार रोहित पवार यांनी दुःखातून बाहेर पडत आहोत. पण सर्व लोकांसमोर लवकरच मांडणार आहे. 12 तारखेला प्रेस घेणार आहे. रोहित पवार यांच्या होणाऱ्या प्रेससंदर्भात सर्वत्र उत्सुकता असतानाच, अजित पवार राष्ट्रवादीचे (NCP) आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, अधिकच उत्सुकता वाढवली आहे.
आमदार रोहित पवार घेणार असलेल्या 12 तारखेच्या प्रेसवर, आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, "रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे. मी पण पत्रकार परिषद बघणार आहे, त्यांच्याकडे काय पुरावे आहेत. आम्ही भावनिक दृष्टिकोनातून बोलतो, असं त्यांनी जरी सांगितलं असेल. पण भावनिकता प्रत्येकाच्या मनात आहे, रोहित पवार यांच्या मनात देखील आहे. ते सत्यता उलगडा करतील, असा मला वाटतं."
अमोल मिटकरी यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. अजितदादांचा कुणी कार्यक्रम बदलला? कोण दादाला भेटलं होतं? पहिल्या दिवशी दादांचा दौरा कसा होता? दुसऱ्या दिवशी विमानाचा दौरा अचानक कसा झाला? त्यानंतर दादासोबत कोण होतं, विमानात सहा लोक बसले होते की 5 होते? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत, या सर्व गोष्टी रोहित पवार पत्रकार परिषद मध्ये बोलतील, असं त्यांच्या बोलण्यावरून एकंदरीत कळतं, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
12 तारखेरच्या पत्रकार परिषद राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात अजितदादांनी त्यांना काय सांगितलं होतं. पवार साहेबांसोबत काय सवांद साधला. याबाबत देखील रोहित पवार गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळेचं त्यांची पत्रकार परिषद पाहावी लागणार आहे. रोहित पवार वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत, मी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. जरी आम्ही वेगळ्या पक्षात काम करत असलो. तरी आधारवड आदरणीय पवार साहेब आहेत, असेही आमदार मिटकरी यांनी म्हटले.
पवारसाहेब पवार कुटुंबाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त आणि सदस्यांचे ते कुटुंब आहे. म्हणून आम्ही खंबीरपणे पवारसाहेबांच्या सोबत आहोत. मी स्वतः आहे. अजितदादा संदर्भात रोहित पवार जे काही भूमिका घेत असतील, त्यात 100% त्यांच्यासोबत आहोत, असेही अमोल मिटकरी यांनी भूमिका मांडली.
अजितदादांचा घातपात झाला असेल? याचा कुणी मास्टरमाईंड निघाला, याचे मोठे परिणाम त्याला भोगावे लागतील. त्याची त्याने कल्पनाही केली नसेल. अजूनही आम्हाला अजिबात सूचनासे होतं आहे, अजितदादा गेले, हे अजून आमचं मन मानायला तयार नाही. रोहित पवारांचे पत्रकार परिषद आटोपल्यानंतर स्वतः मी सविस्तर चर्चा करेल, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.