Prajkata Mali, Amol Kolhe, suresh Dhas  Sarkaranama
महाराष्ट्र

Amol Kolhe News : प्राजक्ता माळी अन् धस यांच्या वादात अमोल कोल्हेंच मोठे विधान; म्हणाले,...

Suresh Dhas Vs Prajkata Mali News : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यभरातील वातावरण तापले आहे. त्याच प्रकरणातून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या दोघांच्या वादात आता अभिनेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठे वक्तव्य केले.

प्राजक्ता माळी हिने शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत सुरेश धस (Suresh Dhas) यांचा निषेध नोंदवला, त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी धस यांच्या टिकेनंतर अभिनेत्री प्राजक्ताने मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. धस यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईबाबत पाऊल उचलणार असल्याचा इशाराही प्राजक्ताने दिला आहे.

या दोघांच्या वादात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उडी घेतली आहे. या वक्तव्यावरून वाद होईल, असे वाटले नव्हते. वाद निर्माण झाला नसता तर बरे झाले असते. सुरेश धस यांचे यांचे स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होते. त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही. सुरेश धस यांच्याकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही. धस यांचे स्टेटमेंट हे सरळ आहे, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी धस यांची बाजू घेतली.

खासदार कोल्हे म्हणाले, 'एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे. हे संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले पाहिजे. बीडमध्ये मोर्चाला झालेली गर्दी पाहता सर्वसामान्य जनता जागी आहे हे मोर्चातून दिसते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सापडायला एवढे दिवस लागतायत याचा अर्थ कोणतरी पाठिशी आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.'

सुरेश धस त्यांच्या भूमिकेवर ठाम

प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न आहे. प्राजक्ता माळी यांचे काहीतरी गैरसमज झालेले आहेत, त्यांनी माझा कालचा बाईट पुन्हा एकदा ऐकावा. अन्यथा मी मुंबईत जाऊन त्यांची भेट घेईन. त्यांना कोणीतरी पत्रकार परिषद घ्यायला सांगितले असावे. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली असेल. मी त्यांच्याबद्दल काही चुकीचे बोललेलो नाही. त्यामुळे मी माफी मागणार नाही. त्यांनी जर माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून मी पाहत असलेला हास्य जत्रा कार्यक्रम पाहणार नाही, असे सुरेश धस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT