Ncp News : राज्य मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य संपेना; अजितदादांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांने स्वीकारला नाही पदभार

Minister Refuses Charge : गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सत्तास्थापनेनंतर राजकीय घडामोडीना आता वेग आला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने ते नाराज आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील काही आमदारही नाराज असल्याचे पुढे आले होते. या नाराज असलेल्या आमदारांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढली होती तर भुजबळ यांनी ही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन खदखद बोलून दाखवली होती. खातेवाटप मार्गी लागल्यानंतर नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू मंत्री दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याचे समोर आले आहे. खातेवाटप होऊन सात दिवस उलटले तरी त्यांनी अद्याप क्रीडा खात्याचा पदभार स्वीकारला नसल्याचे समजते.

गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. या ना त्या कारणावरून नाराजी पुढे येत आहे. त्यामुळे तीन घटक पक्षाची नाराजी दूर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्ती केली होती. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता दत्तात्रय भरणे नाराज असल्याने मंत्रीपदाचा पदभार त्यांनी स्वीकारलेला नाही. क्रीडा मंत्री भरणे हे नॉट रिचेबल असल्याचे समजते.

Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder Case : ‘अजितदादा बीडचं पालकमंत्री व्हा म्हणजे तुम्हाला किती अंधारात ठेवलंय ते कळेल’

क्रीडा खाते मिळाल्याने दत्तात्रय भरणे (Dattaray Bharne) नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही आपल्या मंत्रि‍पदाचा कारभार स्वीकारलेला नाही. नाराज असल्याने ते सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती आहे. दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. त्याचा पदभार त्यांनी अद्याप घेतलेला नसल्याचे समजते.

Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder : देशमुख खून प्रकरणावर मुंडेंचे मोठे भाष्य; ‘माझ्या जवळचा असला तरी सोडू नका, त्यालाही फाशी द्या’

दरम्यान, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेशात गेले आहेत. क्रीडा खाते मिळाल्याने ते नाराज आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. ते थेट मंगळवारी भारतात येतील, अशी माहितीही त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने दिली आहे.

Ajit Pawar
BJP Leader Supports Dhas : भाजपच्या बड्या नेत्यानं घेतली धस यांची बाजू? मुंडेंच्या राजीनाम्याबाबत केलं मोठं विधान

इंदापूर मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणाऱ्या दत्तात्रय भरणेंची ओळख उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून आहे. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक दिवस उलटून देखील त्यांनी कारभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, आता ते सुट्टीसाठी सहकुटुंब परदेशात गेले आहेत. त्यांच्या नाराजीची चर्चा मतदारसंघात देखील आहे. त्यामुळे आता त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर केली जाते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar
UBT Shivsena vs BJP : दहा वर्षे खासदार कोणामुळे, हे विसरलात का ? ठाकरेंच्या खासदारांचा भाजपच्या महिला नेत्याने घेतला समाचार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com