Prakash Ambedkar and Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar and Ajit Pawar : अजितदादा महायुतीतून बाहेर पडा; आंबेडकरांच्या ऑफरमागे मोठा राजकीय गेम!

Prakash Ambedkar advice to Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडून वंचितबरोबर आघाडी करून विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याची राजकीय ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी दिला. अजितदादा यावर काय भूमिका मांडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर कधी कोणता राजकीय गेम खेळतील, याचा नेम नाही. आता त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना राजकीय ऑफर दिली. महायुतीमधून बाहेर पडून वंचितबरोबर आघाडी करा, अशी ऑफर दिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आंबेडकर यांच्या ऑफरमुळे खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीची राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली. महायुती, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मैदानात आहेत. लोकसभा निवडणुकीत 'एकला चलोचा नारा' देणारा वंचित बहुजन आघाडी देखील विधानसभा निवडणुकीत राजकीय आखाडे बांधतोय. 'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर मित्रपक्षाच्या शोधात दिसतो. यातून त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे चाचपणी केल्याचे दिसते. यासाठी आंबेडकर यांनी अजितदादांना दिलेली राजकीय ऑफर चर्चेत आलीय.

विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी अजितदादांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. "विधानसभेला वंचितबरोबर या, राज्यात अजितदादांचे राजकीय वर्चस्व निर्माण करून देऊ. अजित पवार गट महायुतीत अस्वस्थ आहे. 'वंचित'कडे जात असल्याचे सांगून जागा वाढवून घेत आहे. अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे. त्यांची जबाबदारी आम्ही घेतो", अशी राजकीय ऑफर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली.

अजितदादा हे राज्यातील दिग्गज नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एकटे घेऊन ते महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला समोरे जात आहे. लोकसभा निवडणुकीला अंदाज आला असला, तरी अजितदादांना विधानसभा निवडणूक सोपी नाही. त्यामुळे ते महायुतीत असून देखील अस्वस्थ दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांनी त्यांचे राज्यात राजकीय लाॅचिंग करताना दिसत आहेत. महायुतीकडून जादा जागा मिळवण्यापासून ते त्या निवडून आणण्यापर्यंतची त्यांची लढाई असणार आहे. यामुळे त्यांचा महायुतीतील संघर्ष लपून राहिलेला नाही. यातूनच प्रकाश आंबेडकर यांनी अजितदादांना दिलेली राजकीय ऑफरमुळे महायुतीमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्यात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT