Prakash Ambedkar : राजकारणात होणार उलथापालथ? प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार

Maharashtra Politics Vanchit Bahujan Aaghadi : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता काही दिवस उरले असून प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना वंचित बहुजन आघाडीही कामाला लागली आहे. या घडामोडी घडत असतानाच आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज (ता. 16) मोठी घोषणा करणार आहेत. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणणार का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व प्रकाश आंबडेकर यांच्याकडे असेल, असेही सांगितले जात आहे. त्यांना प्रहार संघटनेचे बच्चू कडू, मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे, काही ओबीसी, मुस्लिम समाजातील नेते व संघटना साथ देणार असल्याचीही चर्चा आहे.

Prakash Ambedkar
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांनी स्वत: पोलिसांना बोलवले; गेस्ट हाऊसवर दोन तास बैठक...

औरंगाबादमध्ये आंबेडकरांची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याचवेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करून संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता वाढवली आहे. या घोषणेकडे महाविकास आघाडीसह महायुतीचेही लक्ष राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने महाविकास आघाडीला साथ न देता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितचा आघाडीला फटका बसेल, अशी चर्चा होती. पण ती फोल ठरली. याउलट आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीला लोळवलं. वंचितचा प्रभाव यावेळी फारसा दिसून आला नाही.

निवडणुकीनंतर आंबेडकरांकडून सातत्याने आघाडीवर टीका केली जात आहे. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा निशाणा ते साधत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतरही आंबेडकरांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते.

Prakash Ambedkar
Vishalgarh Encroachment Case : इम्तियाज जलील तेव्हा तुमचा कंठ का फुटला नाही? अंबादास दानवे यांनी सुनावले...

विधानसभा निवडणुकीत आंबेडकर महायुतीसह आघाडीलाही टक्कर देणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आता ते कुणाला सोबत घेणार, तिसऱ्या आघाडीचे बिगुल वाजणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचे उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत आंबेडकर देतील, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com