RSS ammunition smuggling case : पुण्याच्या खडकी दारूगोळा कारखान्यातून चोरीला जात असलेल्या जिवंत काडतुसांमागे आंतरराज्यीय शास्त्रस्त्र आणि दारूगोळा तस्करी प्रकरणात मोठ्या रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. विशेष कार्य दल (STF) आणि तपास यंत्रणांनी गेलेल्या 44 हजारांहून अधिक जिवंत काडतूस जप्त केली असून, याचा बिहार, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे पुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे.
याच दारूगोळा तस्करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या तिघांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी, भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 'आरएसएस'वर पुन्हा बंदी का घालू नये? कदाचित कायमस्वरूपीच! अशी मागणी केली आहे.
विशेष कृती दलाच्या आणि तपास यंत्रणांनी संयुक्त कारवाईत ही जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या तस्करीच्या नेटवर्कमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) निगडीत असलेले सदस्य चंदन तिवारी, अभिषेक तिवारी, ललटू कुमार आणि सारस कुमार या तिघांना अटक केली आहे. यांच्यासह अनेक व्यक्तींचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार समोर येताच, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे की, आरएसएस ही भारतविरोधी संघटना आहे. नागपुरात दसरा उत्सवादरम्यान 'आरएसएस'कडून केली जाणारी शस्त्रपूजा ही केवळ दलितांना दहशत दाखवण्याच्या ऐतिहासिक परंपरेचे प्रतिबिंब नाही, तर देशाच्या सशस्त्र दलांनाच वापरण्याची परवानगी असलेल्या शस्त्रांचे सार्वजनिक प्रदर्शनही आहे, असा घणाघात केला.
प्रकाश आंबेडकर यांनी, भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या आरएसएसवर पुन्हा बंदी का घालू नये? कदाचित कायमस्वरूपीच! जातीयवादी, दलितविरोधी, आदिवासीविरोधी, अल्पसंख्याकविरोधी, संविधानविरोधी आणि भारतविरोधी असल्याचा आरोप असलेल्या आरएसएसच्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे' रक्षण राहुल गांधी का करू इच्छितात? असे दोन प्रश्न करत, ते सर्वांनी विचारावे, असे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी हे आरोप करताना एक्सवर, दोन फोटो आणि राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या फोटोमध्ये 14 जण उभे आहेत. त्यातील तिघे सोडून 11 जणांनी संघाचा गणवेश घातला असून, प्रत्येकाच्या हातात काठी आहे. यातील तिघांच्या चेहऱ्याला हिरव्या रंगाने वर्तुळ केलेले आहेत. काडतूस तस्करी प्रकरणातील ते आरोपी असावेत. त्याच्याच शेजारी दुसरा फोट्यामध्ये सरसंघचालकांचा शस्त्रास्त्र पुजनाचा फोटो आहे. त्यानंतर राहुल गांधीचा व्हिडीओ आहे.
पुण्यातील खडकी दारूगोळा कारखान्यातून काडतुसे चोरीला गेल्याच्या आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या तिघांच्या अटकेवरून, डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या कथित आरोपांमुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आंबेडकरांनी हे आरोप करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला टार्गेट करताना, राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर करून, काँग्रेसला देखील सुनावले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.