Shrirampur murder case : 800 रुपयांच्या फटाक्यांवरून वाद; तलवार, कुऱ्हाड घेऊन टोळक्याचा हल्ला, कार अंगावर घालून एकाला संपवलं!

Shrirampur murder case, Shrirampur crime news, Tilaknagar attack, Shafi Pathan death, firecracker dispute, car attack, Maharashtra crime news : श्रीरामपूरच्या टिळकनगरमध्ये मध्यरात्री दहशत; शफी पठाण यांचा मृत्यू, भारत खंडागळे आणि रियाज शेख यांच्यासह तिघे गंभीर जखमी; दोघांना अटक.
Shrirampur murder case
Shrirampur murder caseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shrirampur Tilaknagar incident : दिवाळीच्या फटाक्यांचे 800 रुपये देण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हल्ल्यात झाले. तलवार, चाकू आणि कुऱ्हाड घेऊन आलेल्या टोळक्याने दहशत माजवत कार अंगावर घालून केलेल्या हल्ल्यात शफी नवाब पठाण यांचा मृत्यू झाला.

तर भारत कैलास खंडागळे, रियाज शेख यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले. श्रीरामपूरच्या टिळकनगर भागात रविवारी (ता. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी मोईनुद्दीन शकील पठाण (वय 23, रा. पंचशील कॉलनी, टिळकनगर) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर राहुल गुंजेकर, अक्षय राहुल गुंजेकर, आनंद अमर पवार, अमित रविकांत पटारे, अमित रावसाहेब कोळगे, मनोज रावण साळवे, सिद्धार्थ रेणे आणि उमर शेख या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गुंजेकर व अमित कोळगे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, मोईनुद्दीन यांनी दिवाळीनिमित्त टिळकनगर येथील श्रीरामपूरच्या (Shrirampur) कामगार चौकात फटाक्यांचे दुकान लावले होते. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सागर गुंजेकर, आनंद पवार, अमित पटारे व उमर शेख हे स्विफ्ट डिझायर कारमधून दुकानावर आले. त्यांनी 800 रुपयांचे फटाके खरेदी केले. पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार देत मोईनुद्दीन यांना धमकी दिली. त्यानंतर अमित कोळगे, मनोज साळवे व सिद्धार्थ रेणे यांनीही त्यांना दमदाटी केली.

Shrirampur murder case
Ravindra Dhangekar targets BJP : 'गोकुळ'चा सत्तासंघर्ष! शिवसेनेच्या धंगेकरांनी पुणे महापालिका 2017चा किस्सा उकरून काढला; भाजपला डिवचलं!

हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर

रात्री साडेदहाच्या सुमारास अमित पटारे, मनोज साळवे व सिद्धार्थ रेणे हे दुचाकीवरून मोईनुद्दीन यांच्या घरासमोर आले. यावेळी अमित पटारे याने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मोईनुद्दीन यांनी वार चुकवून आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे नातेवाईक घराबाहेर आले. त्यावेळी आरोपी तेथून पळून गेले. काही वेळाने सागर गुंजेकर हा कुऱ्हाड घेऊन कारमधून तेथे आला. त्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. कारमधील उमर शेख याने तलवार, तर आनंद पवार व अमित पटारे यांनी चाकू हवेत फिरवून दहशत निर्माण केली. यावेळी सागरने कारमधील अमितला संबंधितांना गाडीखाली घालून मारण्यास सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Shrirampur murder case
Pawan Khera : 'ईद'चा अर्थ गुगलवर शोधा! खरगेंच्या बचावासाठी पवन खेडा मैदानात; भाजपला डिवचले

शफी पठाण यांच्या अंगावर वाहन घातले

त्यानंतर अमित पटारे याने भरधाव कार मोईनुद्दीन यांचे चुलते शफी पठाण यांच्या अंगावर घातली. कार मागे घेऊन पुन्हा त्यांच्या अंगावर घातल्याने ते गंभीर जखमी झाले. वाचवण्यासाठी धावलेल्या इतरांनाही कारने धडक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये भारत खंडागळे व रियाज शेख यांच्यासह अन्य एक जण जखमी झाले. दरम्यान, घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिल्यानंतर स्विफ्ट डिझायर कार पलटी झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले.

पसार हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना

जखमींना सुरुवातीला श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शफी पठाण यांना मृत घोषित केले. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे टिळकनगर परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल लहाने करीत आहेत. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक जयदत्त भवर, सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, स्थानिक गु्न्हे शाखेचे निरीक्षक संदीप मुटकुळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.