nepal Protest Sarkarnama
महाराष्ट्र

Nepal Protest : नेपाळ अस्थिर करण्यात 'या' देशाचा हात, भारतालाही धोका?; प्रकाश आंबेडकारंनी व्यक्त केली चिंता

Prakash Ambedkar Nepal US : भारतीय उपखंडातील देश अस्थिर करण्याचा प्रयत्न अमेरिका करत असल्याचा दावा वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Roshan More

Prakash Ambedkar News : नेपाळमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांना मारहाण आणि त्यांची घरे पेटवून दिली जात आहेत.दरम्यान, भारताचे शेजारी देश असलेल्या बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामागे अमेरिकेचा अदृश्य हात असल्याचा सूचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील भू-राजकीय परिस्थिती नव्याने घडवण्याचा हा अमेरिकेचा सुनियोजित प्रयत्न आहे बांगलादेश, नेपाळ या दोन्ही देशांतील आंदोलने जरी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि लोकशाहीचा ऱ्हास यांसारख्या स्थानिक समस्यांमुळे सुरू झाली असली तरी, या आंदोलनांचा फायदा घेऊन मोठे राजकीय संकट निर्माण करण्यात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे नाकारता येणार नाही.

आंबेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, अमेरिकेने पाकिस्तानमधील चीनचा प्रभाव आधीच कमी केला आहे. आता आपण बांगलादेश आणि नेपाळमध्ये भारत समर्थक आणि चीन समर्थक सरकारे कोसळताना पाहत आहोत. ‎

बांगलादेश भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला पायउतार व्हावे लागले.‎नेपाळचे चीन समर्थक पंतप्रधान के.पी. ओली यांना 'जनरेशन झी'च्या नेतृत्वाखालील आंदोलनांमुळे राजीनामा द्यावा लागला. ‎या घटनांवरून असे दिसून येते की, अमेरिका दक्षिण आशियामध्ये एका मोठ्या भू-राजकीय रणनीतीचा भाग म्हणून आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT