Narayan Rane V
Narayan Rane V Sarkarnama
महाराष्ट्र

Narayan Rane Vs Thackeray : '' राणे ठाकरेंचं भांडण म्हणजे नवरा बायकोचं भांडण;त्यात...''; प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं

सरकारनामा ब्यूरो

Pune News: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकल्पावरुन मोठं घमासान पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी बारसू प्रकल्पावरुन पेटलेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या प्रकल्पावरुन ठाकरे गट आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातही शाब्दिक चकमक झडत आहे. यावरुन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे राणेंना टोला लगावला आहे.

संभाजीराजे छत्रपती(Chhatrapati SambhajiRaje) यांनी सोमवारी(दि.१) पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, ब्रिटिश वृत्ती अजून गेली नाही,ती अर्धवट आहे. राज्य आणि लोक यांच्यासाठी काय हवं हे अजून सरकारला कळलंच नाही. बारसु प्रकल्पाला आमचा विरोध आहे.

त्यासाठी सरकारने दुसरी जागा आहे ती शोधावी. कारण कोकणातच का तर आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान आहे ते संपवायचं आहे. याचवेळी त्यांनी राणे ठाकरे भांडण म्हणजे नवरा बायकोचं भांडण आहे. त्यात राज्याच्या हिताचं काय असा सवालही उपस्थित केला आहे.

तसेच छत्रपती संभाजीराजे आणि माझी राजकीय विषयावर भेट झाली,मराठा आरक्षण निकाल लावायचा असेल तर सत्ता सत्ता हवी,आतापर्यत मराठा आरक्षणाबाबत फक्त राजकारण झालं,संघटन तयार केलं आहे त्यावर चर्चा झाली,आम्ही एकत्रित यायचं की नाही यावर ते सवंगडीशी चर्चा करून ठरवतील असंही आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

मोदी आणि शाह यांना उल्लू बनवणारा...

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) या्ंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्यासोबत ३५ ते ४० आमदार जाणार असल्याचंही बोललं जात आहे. एप्रिल महिन्यात अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना बळच मिळालं. पण त्यांनी माध्यमांसमोर या अफवा असल्याचं स्पष्ट केलं. तरीदेखील या चर्चा अद्यापही थांबलेल्या नाहीत.

याचदरम्यान, आजच्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या केंद्रस्थानी अजित पवार असतील. देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना उल्लू बनवणारा एकमेव नेता अजित पवार आहेत.

एकत्र यायचं की नाही ते...

छत्रपती संभाजीराजे आणि माझी राजकीय विषयावर भेट झाली,मराठा आरक्षण निकाल लावायचा असेल तर सत्ता सत्ता हवी,आतापर्यत मराठा आरक्षणाबाबत फक्त राजकारण झालं,संघटन तयार केलं आहे त्यावर चर्चा झाली,आम्ही एकत्रित यायचं की नाही यावर ते सवंगडीशी चर्चा करून ठरवतील असंही आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT