BRS News: महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी केसीआर यांचा मोठा प्लॅन; चिरंजीव अन् जावयांवर सोपवली 'ही' जबाबदारी

K. Chandrashekar Rao : केसीआर यांचे चिरंजीव मंत्री के.टी.रामा राव व जावई हरिष राव हे लवकरच सोलापुरात येणार आहेत.
K. Chandrashekar Rao
K. Chandrashekar RaoSarkarnama

Solapur News : गेल्या काही दिवसांपासून भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच बीआरएसने के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी सभा घेतल्या आहेत.

आता शनिवार (ता.6) पासून बीआरएस पक्षाने महाराष्ट्रभर जनजागरणाची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिनाभर बीआरएसच्या राजकीय ध्येय धोरणाच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचे काम या मोहिमेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

K. Chandrashekar Rao
Raju Shetti News: 'बारसू'वरून राजकारण तापलं; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी!

बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी मराठवाड्यात सभा घेऊन पक्षाचा विस्तार महाराष्ट्रात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. पहिल्या टप्प्यात सभा व काही नेते मंडळीच्या मदतीने केसीआर यांनी स्वतः पायाभरणी केली. त्यानंतर पक्षाची भूमिका मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने मराठीतच प्रचार मोहिम हाती घेतली आहे.

केसीआर यांचे जावई तथा तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी या मोहिमे संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. महाराष्ट्रात राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत राष्ट्र समितीकडून (बीआरएस) प्रयत्न सुरू आहेत.

6 मे पासून सोलापूरसह महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात, वाड्या -वस्त्यांवर तेलंगणा सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी प्रचार वाहने फिरणार आहेत. 6 जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

K. Chandrashekar Rao
Uddhav Thackeray : एकीच्या आणाभाका घेणाऱ्या नेत्यांमध्येच पोडियमवरून मतभेद; वज्रमूठ सभेतील प्रकाराची कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज

दरम्यान, सोलापूरमधील विकासात्मक बाबींची पडताळणी करण्यासाठी तसेच येथील प्रमुख समस्या जाणून घेण्यासाठी केसीआर यांचे चिरंजीव मंत्री के.टी.रामा राव व जावई हरिष राव हे लवकरच सोलापुरात येणार आहेत.

प्राथमिक भेटीमध्ये काही नेते व जाणत्या मंडळींनी पक्ष प्रवेशाबद्दल तयारी दर्शवल्यानंतर पुढील नियोजन सुरु झाले आहे. तसेच बीआरएस पक्षात जाण्यासाठी विविध पक्षातील आजी-माजी नगरसेवक उत्सुक असल्याचेही बोलले जात असून काही दिग्गजांनी केसीआर यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com