Prakash Ambedkar demand to Devendra Fadnavis about Ashok Kharat Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : अशोक खरातची जात शोधून काढा, मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रकाश आंबेडकरांची मागणी

Prakash Ambedkar letter to Devendra Fadnavis details: अशोक खरातशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Roshan More

Prakash Ambedkar News : अशोक खरात प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या विरोधात 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. ज्या महिलांवर त्याने अत्याचार केले त्यांनी तक्रार देण्याचे आवाहन एसआयटीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, अशोक खरात याची जात शोधून काढण्याची अजब मागणी 'वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मागणी करतो की, अशोक खरात हा मराठा समाजाचा आहे की दुसऱ्या जातीचा, याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.'

अशोक खरातशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. मराठा समाजातील गुन्हेगारांना जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील आंबेडकर यांनी केली आहे.

भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि या प्रकरणाची सत्यता जपण्यासाठी त्याला उच्च सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात यावे, अशी देखी त्यांनी मागणी केली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिलेवर कारवाई केली परंतु, खरातच्या व्हिडीओमध्ये अनेक बुवा सुद्धा आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? फडणवीसांनी कधी कारवाई करणार याची तारीख त्यांनी सांगावी. अन्यथा चुकीचा संदेश जाईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

खरातच्या कोठडीत वाढ

अशोक खरात याची कोठडी रविवार( ता.29) समाप्त होत होती. त्याच दिवशी त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजुच्या युक्तीवादानंत न्यायालयाने खरातची रवानगी पुन्हा पोलिस कोठडीत केली आहे. त्याला चार एप्रिलपर्यंती कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT