Ashok Kharat News: भाजपच्या 'या' नेत्याला CM व्हायचं होतं,म्हणून...; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं खरातचं नवं 'कनेक्शन' आणलं समोर

Congress Leader On Ashok Kharat News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारनं अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली, तर सध्याच्या मंत्रिमंडळातील एक डझन मंत्री तुरुंगात जातील, असा खळबळजनक विधान बुधवारी (ता.25) केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
Ashok Kharat Bjp .jpg
Ashok Kharat Bjp .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं राज्य हादरलं आहे. विकृतीचं टोक गाठलेल्या या प्रकरणाचा आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वातील एसआयटीमार्फत सुरू असलेल्या चौकशीनं वेग पकडला असतानाच दुसरीकडे फडणवीस सरकारही अॅक्शन मोडवर आलं आहे. पण याप्रकरणात मंत्री,नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या गंभीर आरोपांनी सरकारसमोरच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.आता मंत्री चंद्रकांत पाटलांवर खरात प्रकरणात हादरवणारा आरोप काँग्रेस नेत्याकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारनं अशोक खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली, तर सध्याच्या मंत्रिमंडळातील एक डझन मंत्री तुरुंगात जातील, असा खळबळजनक विधान बुधवारी (ता.25) केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबाचे कारनामे सहा महिन्यांपासून माहीत होते. फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक, मंत्रिमंडळातील सहकारी यांचे खरातशी संबंध असल्यानेच माहिती मिळूनही फडणवीसांनी काही कारवाई केली नव्हती. पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचंच मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्र-मंत्र व अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांनी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरु केल्याचा गौप्यस्फोट सपकाळ यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.

याचदरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक खरातसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या फोटो समोर आले होते. आता या फोटोवरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी पाटलांवर टीकेची झोड उठवली आहे. चंद्रकांत पाटील यांचे भोंदूबाबा अशोक खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा केल्याची माहिती असल्याचा दावा सपकाळ यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

Ashok Kharat Bjp .jpg
BJP News : महापालिकेत भाजपच्या सभापतीकडून एमआयएमची 'कोंडी'; निधी हवा असेल तर छत्रपती संभाजीगरचा उल्लेख असलेले पत्रच हवे!

भोंदूबाबा अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मित्रपक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अशोक खरातच्या सर्व अघोरी उद्योगांची कुणकुण फडणवीसांना लागली होती. पण अखेर हे अघोरी उद्योग खूपच वाढल्यानंतर त्यांनी खरातवर कारवाईचा बडगा उगारल्याचं दावा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीत ठिणगी टाकली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक खरातच्या इशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2018 साली 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे ही या बाबांशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत.

Ashok Kharat Bjp .jpg
Rupali Chakankar controversy : रुपाली चाकणकरांना सुनील तटकरे वाचवतायेत, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

नाशिक सत्र न्यायालयानं भोंदूबाबा अशोक खरात याला मंगळवारी (ता.25) 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी सरकारी वकिलांनी खरातसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी खरातवर झालेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी ही पोलिस कोठडी मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com