Prakash Ambedkar on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला, दोन्ही बाजूने पूर्णविराम मिळाला असला तरी, यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी, मोठे भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे भाजपची 'ए टीम' आणि 'बी टीम' आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजे, भाजपचे (BJP) 'ए' आणि 'बी' टीम आहे. शरद पवार कधीही मोदी आणि अमित शहाने सांगितलेला एकही प्रश्न धुडकवू शकत नाही. राष्ट्रवादी भाजपच्या इशाऱ्यानुसार काम करते, हे सांगताना प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशाच्या गेल्या निवडणुकांचा संदर्भ दिला.
अखिलेश यादव यांनी ऐनवेळी चंद्रशेखर आझाद यांना बोलावून घेतले होते. शेवटच्या क्षणी ही घडामोड झाली. स्वतःचीच परिस्थिती वाईट करून घेतली आहे. तिथे चंद्रशेखर यांनी अखिलेश यांना दलितांचे मते पाहिजेत, पण दलित नेते नको, असे म्हटले होते. प्रेसमध्ये काय बोलायचे, हे सर्व ठरवून झाले होते, असा दावा देखील प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला.
विलीनीकरणानंतर, विरोधी पक्षामध्ये किंवा आपल्या विरोधात आघाडी लागते, याच्यात खो घालणारा माणूस चालला आहे, हे भाजप कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विलीनीकरण अजिबात होणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
महायुतीत, एकनाथ शिंदे शिवसेनेला गेल्या तीन महिन्यात जी वागणूक दिली, त्यामध्ये अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वजन वाढायला लागले होते. भविष्यात एकनाथ शिंदेंसारख्याच डोईजड होऊ नयेत, म्हणून कट टू साईडचा हा खेळ होता एवढेच, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केला, असा देखील दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी, भाजप आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलावर भाष्य केले. ते म्हणाले, "सरकारने 50 टक्के किंवा 100 टक्क्याने जरी जागा वाढवल्या तरी जी लोकसंख्या कमी झाली आहे ती बदलू शकत नाही. दक्षिण भारतातील राज्यांची लोकसंख्या 15 टक्क्याने कमी झाली आहे, तर उत्तरेतील राज्यांची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे जागा वाढवून काही साध्य होणार नाही. लोकसंख्येचा असमतोल हा राहणारच आहे."
"या गंभीर विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांची प्रदीर्घ चर्चा झाली आहे ती चर्चा डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या खंडा मध्ये सविस्तरपणे आली आहे. 50 वर्षानंतर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हे विभाजन होणार नाही, हे सांभाळण्याची जबाबदारी ही सरकारची असेल, अशी अपेक्षा तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती," याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.