Prakash Ambedkar questions the justice system over the Malegaon bomb blast case: “Will Brahmins and RSS members ever be punished?” Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : '...तर RSS अन् कोणत्याही ब्राम्हणाला दोषी ठरवले जाणार नाही', प्रकाश आंबेडकरांचा 'मालेगाव' निकालावर गंभीर सवाल

Malegaon Bomb Blast Case: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात कोणतीही दोषी आढळले नाही तर सहा नागरिकांचा बळी नेमका कोणी घेतला?

Roshan More

Prakash Ambedkar News : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींना न्यायलायने निर्दोष सोडले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. तर, पीडित कुटुंबीयांकडून आपल्याला न्याय मिळाला नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात एटीएसने, हेमंत करकरे यांनी तपास केलेली कागदपत्रे कुठे आहेत? नवीन तपास का सुरू केला? लष्करी अधिकाऱ्यांसह अनेकांनी न्यायालयात आपल्या साक्षी फिरवल्या सरकारी वकिलांनी त्यांच्यापैकी कोणावरही खोटी साक्ष दिल्याचा आरोप का दाखल केला नाही? असे प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत विचारले आहेत.

'या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे! अन्यथा, पूर्वीच्या मनुच्या कायद्यांप्रमाणे कोणत्याही ब्राह्मणाला दोषी ठरवले जाणार नाही? किंवा आरएसएस आणि त्याच्याशी संबंधित सदस्यांना कधीही दोषी ठरवले जाणार नाही!', असे देखील आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

'त्या' अधिकाऱ्यांची चौकशी का नाही?

मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडून करण्यात आला होता. एटीएसकडून दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. नंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की,एटीएसकडे बनावट पुरावे असतील, तर एनआयए न्यायालयाने दोषपूर्ण तपासासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार का ठरवले नाही आणि विभागीय चौकशीचे आदेश का दिले नाहीत? असा प्रश्न ही आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

सहा जणांचे बळी कोणी घेतले?

न्यायालयाने मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी बाॅम्बस्फोट मृत्यू झालेल्या त्या सहा जणांचा बळी कोणी घेतला असा देखील सवाल उपस्थित केला आहे. तसेच आधीपासून एक ठोस तपास सुरू होता, तेव्हा एआयएने पुन्हा नवा तपास का सुरू केला? याचे स्पष्टीकरण एनआयएने द्यावे असे देखील म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT