Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 'या' विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार केला दुप्पट

Nitish kumar School Staff Salary Doubled: विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Teacher
Teacher Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Elections: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शिक्षण व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शारीरिक शिक्षक (पीटी टीचर), आचारी आणि रात्रसेवा करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नीतीश कुमार यांनी आज सकाळी सोशल मीडियावर याबाबतची माहिती शेअर केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत. 2025 मध्ये 4 हजार 366 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यात वाढ करण्यात आली आहे.

आता हा निधी 77 हजार 690 कोटी रुपये करण्यात आला आहे. शिक्षकांची नियुक्ती, शाळांसाठी नवीन इमारतींची उभारणी, पायाभूत सुविधा यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असल्याचे नीतीश कुमार यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

शिक्षण संस्थांची प्रगती करण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असते, अशा शब्दात मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. यासाठी मध्यान्ह भोजन व्यवस्थेत कार्यरत असलेल्या आचाऱ्यांचे मानधन 1 हजार 650 रुपयांवरुन 3 हजार 300 रुपये करण्यात आले आहे.

Teacher
Uddhav Thackeray: कोल्हापुरात पहिल्यांदाच ठाकरेंचे 4 जिल्हाप्रमुख आले एकत्र; पाचव्या जिल्हाप्रमुखाचा बार फुसका?

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रात्रसेवेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मानधन 5 हजारांवरुन 10 हजार करण्यात आले आहे. याशिवाय वार्षिक वेतनात यापूर्वी 200 रुपयांनी वाढ व्हायची हे वेतनात आता 400 रुपयांनी वाढ होणार आहे.

22 नोव्हेंबर 2025 ला बिहार विधानसभेची मुदत संपत आहे. त्यापूर्वी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.पावसाळ्याच्या काळात निवडणूक आयोगाकडून निवडणूक घेतली जात नाही. छठ पूजा आणि दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आहे. या सणांच्या तारखा पाहून निवडणूक आयोगाला निवडणुकीचे वेळापत्रक ठरवावे लागणार आहे. 243 विधानसभा मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.

विधानसभेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. जेडीयू आणि भाजप जवळजवळ समान जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे ठरलं आहे. यात जेडीयूला १०२ ते १०३ आणि भाजपला १०१ ते १०२ जागा देण्याचे निश्चित केले आहे. चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास), जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवम मोर्चा (एचएएम) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा यांच्या वाटेवर किती जागा येईल याबाबत फॉर्म्युला ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com