Prakash Ambedkar |Bachchu Kadu Sarkarnama
महाराष्ट्र

Video Ambedkar vs Kadu : बच्चू कडूंचा 'तो' सवाल अन् प्रकाश आंबेडकरांनी फटकारलं; म्हणाले...

Bachchu Kadu Vs Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी कुणबी मराठ्यांबाबत केलेल्य विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून बच्चू कडूंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Akshay Sabale

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठ्यांबाबत केलेल्या एक विधानानं वाद उफाळला आहे. कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आंबेडकर यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

यातच कुणबी मराठे काय लुटारू आणि दरोडेखोर आहेत का? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता. यानंतर आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बच्चू कडू यांना फटकारलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

"कुणबी मराठ्यांपासून सावध रहा. कारण, आताच्या सभागृहात 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 ओबीसींचे आमदार आहेत. कुणबी स्वत:ला ओबीसी म्हणून घेत असला, तर सभागृहात मात्र स्वत:ला मराठा मानतो. त्यामुळे कुणबी मराठ्यांपासून सावध राहा," असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

त्यावर बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, "कुणबी मराठा लुटारू किंवा दरोडेखोर आहेत का? हे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं पाहिजे. सगळ्यांना कसे स्थान देता येईल ही विचारधारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवली आणि घटनेत सुद्धा आणली. पण, प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा दु:ख वाटतं. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात बोलत नाही."

बच्चू कडू यांच्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी फटकारलं आहे. "कळत नसेल, तर माझ्या मते बोलू नये, मी एवढंच सांगेल. मी काय बोलतो, हे पहिल्यांदा समजून घेऊन बोललं, तर उत्तर देणं उचित समजतो. अन्यथा मी दुर्लक्ष करत असतो," असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT