VBA president Prakash Ambedkar announcing Mumbai protest demanding PM Narendra Modi’s resignation over Epstein file and foreign policy issues. Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : "नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाची चिरफाड करत राजीनाम्याची मागणी : प्रकाश आंबेडकर मैदानात; मुंबईत करणार 'धरणे' आंदोलन

VBA Mumbai Agitation March 2 : प्रकाश आंबेडकर यांनी 2 मार्च रोजी मुंबईत वंचित आघाडीचे आंदोलन जाहीर केले आहे. एपस्टीन फाइल, विदेश धोरण, टेरिफ आणि राफेल करारावरून मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Jagdish Pansare

VBA Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव 'एपस्टीन फाइल'मध्ये आले आहे. जेफ्री एपस्टीनच्या सांगण्यावरुन मोदी काही देशांच्या राष्ट्राध्यक्षांसमोर नाचल्याचा उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी 2मार्च रोजी मुंबईत वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या सरकारची विदेश निती, अमेरिकेने लादलेले टेरिफचे संकट, एपस्टीन फाईल या सगळ्या विषयावर भाष्य केले. नरेंद्र मोदी यांनी देश अमेरिकेकडे गहाण ठेवल्याची टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली. व्यापार करारानुसार अमेरिकेतून आयातीवर टेरिफ नाही, मात्र भारतातून अमेरिकेत निर्यातीवर 18 टक्के टेरिफ हा विशेष कर लागू होणार आहे.

भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी थांबवली आहे. या धोरणातून देश गहाण पडल्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापार धोरण आणि एपस्टीन फाइलमधील उल्लेखावर वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन करणार आहे. राज्यभरात आंदोलनातून मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली जाणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

राफेल खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. इंडोनेशियाने फ्रान्सकडून ज्या किमतीत राफेल खरेदी केली त्यापेक्षा भारताने अधिक किमतीने खरेदी केली आहे. मागील काही महिन्यांत भारताने जे विदेश करार केले आहेत, त्यात एपस्टीन फाइलची झलक दिसत आहे. कारण पंतप्रधान मोदी यांचे नाव एपस्टीन फाइलमध्ये आले आहे. मोदी यांनी इतर राष्ट्राध्यक्षांसमोर नाच केल्याचा वाईट उल्लेख त्यात आहे.

अल्पवयीन मुलींशी गैरव्यवहार आणि नरभक्षी लोकांचा सहभाग असल्यामुळे एपस्टीन फाइल जगभर गाजत आहे. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून तेच तेल विकून उद्योजक अंबानी 40 हजार कोटी रुपये कमावतात. ही तेल खरेदी भारताने बंद केली आहे. त्यामागे युक्रेन-रशिया युद्धाची पार्श्वभूमी आहे. या निर्णयाला अमेरिकेशी केलेला व्यापार करार कारणीभूत आहे का याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणीही आंबेडकरांनी केली आहे.

रमजान महिन्यानंतर अमेरिका इराणवर हल्ली करण्याची शक्यता आहे. भारत इराणची साथ सोडणार की त्यांच्या सोबत राहणार? यावरही सरकारने स्पष्टीकरण द्यावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वत:ला देशभक्त म्हणवतात. नरेंद्र मोदी देश विकत असताना आणि राष्ट्राची एकता गहाण टाकत असताना तुमची भूमिका काय आहे? यावर संघाने बोलावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.

भारत पुन्हा स्वातंत्र्य गमावत असताना मध्यवर्गीयांनी आवाज उठवावा. जात व धर्माच्या राजकारणामुळे आपले अधिकार टिकून आहेत, असे सवर्ण समाजाला वाटत आहे. मात्र, जात व धर्मावर देश उभा राहत नसतो. आज वंचित समूह भारतीय राज्यघटनेला महत्त्व देत असताना सत्तेतील सवर्णांनी धर्म व जातीला महत्त्व देणे अनाकलनीय आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT