Prakash Ambedkar, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : नामांतराचा विषय उकरून काढत शरद पवारांकडून आगीत तेल..

Prakash Ambedkar allegations against Sharad Pawar : महाविकास आघाडीकडून अजूनही ठोस भुमिका आरक्षण प्रश्नी घेतली जात नाही, याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला. सध्या नामांतराचा जुना विषय शरद पवार उकरून काढून आगीत तेल ओतत आहेत, असेही आंबेडकर म्हणाले.

Jagdish Pansare

राम काळगे

Latur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडा दौऱ्यात विद्यापीठ नामांतराचा विषय काढला होता. हा निर्णय आपण कसा घेतला होता, काय अडचणी आल्या ? याचा उहापोह केला. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी याचा उल्लेख करत विद्यापीठ नामांतराचा जुना विषय पुन्हा काढून शरद पवार आगीत तेल ओतण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.

ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने निलंगा येथे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावर भाष्य केले. सध्या मराठा व ओबिसी आरक्षणावरून गावपातळीवर मोठा सामाजिक वाद निर्माण होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यानी सर्वच पक्षाच्या प्रमुखांना लेखी पत्र पाठवून भुमिका स्पष्ट करण्याबाबत कळवले आहे.

मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे अद्याप गप्प आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका जातीच्या बाजूनेच झुकत असल्याचे ओबीसी समाजाच्या लक्षात आले आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. शरद पवार, बाळासाहेब थोरात उघड भूमिका घेत नाहीत.

सर्वच राजकीय पुढारी ऐकून न ऐकल्यासारखे करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर कोणताच राजकीय पक्ष उघड भूमिका घ्यायला तयार नाही. (Sharad Pawar) श्रीमंत असलेला निजामी मराठा व रयतेतील गरिब मराठा असा भेदभाव आजपर्यंतच्या मराठा समाजातील नेतृत्वाने केला. जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करावे जेणेकरून त्यांना आरक्षणाबाबत निर्णय घेणे सोपे होईल, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.

वंचित बहूजन विकास आघाडीला बळ देण्यासाठी एस.सी, एस.टी. ओबिसी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. ओबिसी समाजाला सध्या सक्षम नेतृत्व नाही, त्या समाजातील नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरले आहेत. महाविकास आघाडीकडून अजूनही ठोस भुमिका आरक्षण प्रश्नी घेतली जात नाही, याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केला. सध्या नामांतराचा जुना विषय शरद पवार उकरून काढून आगीत तेल ओतत आहेत, असेही आंबेडकर म्हणाले. यापुढे वंचित बहूजन विकास आघाडी सक्षम पर्याय म्हणून राज्यात समोर येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT