Sharad Pawar Politics: भाजपच्या निराश इच्छुकांची उमेदवारीसाठी शरद पवारांकडे रिघ!

Sharad Pawar, BJP aspirants to Sharad Pawar group for assembly Candidacy-विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजप मध्ये प्रवेश केलेल्या इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली आहे.
Sharad Pawar & Saroj Ahire
Sharad Pawar & Saroj AhireSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs BJP News: देवळाली विधानसभा मतदार संघात नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक झाली. हा मतदारसंघ पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे, असे संकेत पक्षाच्या नेत्यांनी दिल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

निवडणुकांचे वातावरण सतत बदलत असते. देवळाली मतदारसंघात याचा अनुभव येऊ लागला आहे. या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सरोज अहिरे विजयी झाल्या होत्या. आमदार अहिरे सध्या सत्ताधारी भाजप पुरस्कृत महायुतीच्या घटक आहेत. विद्यमान आमदार असल्याने या जागेची अदलाबदल होण्याची शक्यता नाही.

देवळाली मतदारसंघात शक्यतो दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतच लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात येथील वातावरण झपाट्याने बदलत आहे. उमेदवारीच्या अपेक्षेने भारतीय जनता पक्षात गेलेल्या इच्छुकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे

Sharad Pawar & Saroj Ahire
Amol Shinde Politics: भाजपच्या डावपेचांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील संकटात

महाविकास आघाडी हा मतदारसंघ विद्यमान आमदार म्हणून शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार या गटांमध्ये लढत होऊ शकेल. हे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात गेलेल्या आणि उमेदवारीची आस लावून बसलेल्या अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे.

भारतीय जनता पक्षाकडे निवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव, माजी आमदार (कै) भिकचंद दोंदे यांच्या कन्या सुवर्णा दोंदे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रीतम आढाव या प्रमुख इच्छुक होत्या. या सर्व इच्छुकांच्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरण्याची मानसिकता झाली आहे

Sharad Pawar & Saroj Ahire
Dr Atmaram Kumbharde: भाजप नेते आत्माराम कुंभार्डे यांनी घातले काँग्रेसचे टी-शर्ट, म्हणाले, कोतवाल माझे गुरु!

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पक्षात जागा वाटपाचे धोरण लवकरच निश्चित होईल. यामध्ये अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातच मुख्य लढत झाली होती. त्यामुळे मतदारसंघाचे वाटप कसे होणार हा उत्सुकतेचा विषय आहे.

महायुतीमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे उमेदवारीच्या अपेक्षेने अनेक इच्छुकांनी भाजपला पसंती दिली होती. आता मात्र महायुतीच्या जागा वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख वाटेकरी बनले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा पडण्याची चिन्हे आहेत. या निराशेमुळे मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे घडतील अशी स्थिती आहे.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com