Eknath Khadse Rupali Chakankar Sarkarnama
महाराष्ट्र

Pune Rave Party Case : महिलांचा अश्लील, अनैतिक वापर; खडसेंच्या जावयाकडून मानवी तस्करी...; रुपाली चाकणकरांचे 'एसआयटी'साठी पोलिस महासंचालकांना पत्र

Pranjal Khewalkar SIT Rupali Chakankar : रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची अडचण वाढणार आहे. महिलांचा अश्लील आणि अनैतिक वापर झाल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

Roshan More

Rupali Chakankar News : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात आरोप प्रत्योरोप सुरू आहेत. आता चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात मानवी तस्करीबाबत तपास करण्यासाठी पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे.

चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे की, 'पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यानी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU)महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फडवणूक, दबाव, इतर कोणतेही माध्यम.. महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी.'

एसआयटी मार्फत चौकशी करा

'हे प्रकरण, केवळ एका पार्टीपुरते मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटीत गुन्हेगारी असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसेच कायदयानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभुमीवर विशेष तपास पथकाची स्थापना करुन प्रकरणी न्यायोचित, सखोल चौकशी वेळेत व्हावी.', असे पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी नमूद केले.

महिला अधिकाऱ्यांचा समावेश करा

महिला अधिकाऱ्याचा समावेश आलेली एसआयटी एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी व्हावी. तपासाअंती दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल, असे रुपाली चाकणकर यांनी पत्राद्वारे पोलिस महासंचालकांना कळवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT