Shivsena UBT News: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एका व्यक्तीने दिल्लीत १६० मतदार संघात आघाडी मिळवून देण्याची ऑफर दिली होती. या बातमीने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप होत असताना, या बातम्या चर्चेचा विषय ठरले आहे.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांना नवी दिल्लीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत १६० जागा निवडून देण्याची ऑफर अज्ञात व्यक्तीने दिली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर निवडणूक चोरीचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणूक हॅक करण्याचे वृत्त खळबळ उडवून देणारे आहे.
अशीच घटना नाशिक शहरातही घडली होती. हा विकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांच्या वॉर रूममध्ये राजस्थानच्या एका व्यक्तीने ईव्हीएम मशीन हॅक करून तुमच्या उमेदवाराला निवडून देतो. त्या बदल्यात ४२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यातील पाच लाख रुपये ऍडव्हान्स मागण्यात आले होते. यावेळी कार्यालयात काम करणारे आनंद शिरसाठ यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली.
संबंधित व्यक्तीने आपली मागणी मान्य न केल्यास उमेदवार गीते यांना ईव्हीएम मशीन हॅक करून पराभूत करेल, असा इशाराही दिला होता. श्री शिरसाठ यांनी ही माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिल्यावर तातडीने याबाबत या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव गणेश शाखेचे संदीप मिरके आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याबाबतचा तपास केला होता. संबंधित चौहान हा अजमेर (राजस्थान) येथील रहिवासी असल्याचे उघड झाले.
संबंधित चौहान याच्या तपासात त्याने निवडणूक आयोगाचे सर्व काम भेल ही कंपनी करीत असते. या कंपनीकडे इव्हीएम मशीन मध्ये फीडिंग करण्यासाठी स्वतःचे कर्मचारी नाहीत. हे कर्मचारी खाजगी संस्थेकडून घेतले जातात. ही मंडळी आपल्या परिचित असल्याने आपण ईव्हीएम मशीन सेटिंगमध्ये घोटाळा करू शकतो. दहा मतदान झाल्यास त्यातील तीन ते चार कोणत्या उमेदवाराला द्यायचे हे सेट करता येते, असा खळबळ जनक दावा या व्यक्तीने केला होता. पोलिसांनी याबाबतची चौकशी केल्यानंतर त्याला जामीन मिळाल्यावर तो पुन्हा कधीच दिसला नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेली सहा महिने विविध मतदारयाद्यांचा अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह विविध निवडणुकांमध्ये मतदारयादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदार याद्याच संकेतस्थळावरून अदृश्य केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या आरोपाला पुष्टी देणाऱ्या प्रकार विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातही घडला होता, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
---------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.