Pratap Sarnaik: Congress leader Vijay Wadettiwar accuses Shiv Sena minister Pratap Sarnaik of acquiring ₹200 crore Mira-Bhayandar land for only ₹3 crore, sparking political storm in Maharashtra. Sarkarnama
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटींमध्ये लाटली : आरोपांमुळे भाजप, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचा मंत्री अडचणीत

Pratap Sarnaik land scam allegations : विजय वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईकांवर मीरा-भाईंदरमधील २०० कोटींची जमीन केवळ तीन कोटींत लाटली असा गंभीर आरोप केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pratap Sarnaik News : राज्याच्या राजकारणात सध्या कथित जमीन घोटाळ्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आधी पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अडचणीत आले होते. नंतर तो व्यवहार रद्द केला होता. आता पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप होत आहेत. विरोधकांनी अजित पवारांवर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही जमीन घोटाळ्याचाच गंभीर आरोप केला आहे.

काँग्रेस नेते विजय वेडीट्टीवार यांनी सरनाईकांवर 200 कोटींची जमीन केवळ 3 कोटींमध्ये लाटली असा आरोप केला आहे. वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील सविस्तर माहिती लवकरच उघड करणार असल्याचे सांगितले. "मंत्र्यांना स्वतःच्या (चॅरिटेबल ट्रस्ट) संस्थेच्या नावावर इतक्या कमी किमतीत अशी जागा घेता येते का? हा महाराष्ट्राला लुटण्यासारखाच प्रकार आहे," अशी टीका करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वडेट्टीवारांचे नेमके आरोप काय?

मीरा-भाईंदर परिसरातील सुमारे चार एकर जमीनाचा हा व्यवहार आहे. या जमिनीचे अंदाजे बाजारमूल्य २०० कोटी रुपयांच्या घरात आहे. पण सरनाईक यांनी ही जमीन केवळ ३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. ही जमीन सरनाईक यांनी त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी (चॅरिटेबल ट्रस्ट) घेतल्याचे म्हटले जात आहे.

प्रताप सरनाईक यांचे प्रत्युत्तर :

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक म्हणाले, "विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत, ते विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. त्यांनी आरोपांचे पुरावे सादर करावेत. मी देखील ही जमीन नेमकी कुठे आहे हे शोधत आहे.

जमीन प्रकरणांमुळे सत्ताधारी टार्गेटवर :

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेते जमीन गैरव्यवहार प्रकरणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव 'पुणे जैन बोर्डिंग' जमीन व्यवहार प्रकरणामुळे चर्चेत आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या पुण्यातील सरकारी जमिनीचा व्यवहारही वादात सापडला आहे. हा व्यवहार नंतर रद्द करण्यात आल्याचे स्वत: अजित पवार यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT