Aurangzeb Tomb Prince yakub habeebuddin tuc sarkarnama
महाराष्ट्र

Aurangzeb Tomb : कबरीचा वाद मिटेना, औरंगजेबाच्या वंशजाचे राष्ट्रपतींना पत्र; 'ती' जागा कोणाच्या मालकीचे सांगून टाकले

Aurangzeb Tomb Prince yakub habeebuddin tucy : माझे पूर्वज औरंगजेबाची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही अत्यंत साधी कबर आहे. तिचे संरक्षण व्हावे, अशी मागणी याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी केली आहे.

Roshan More

Aurangzeb Tomb News : औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकारण पेटले होते. या कबर हटवण्याची मागणी होत असताना तेथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेले स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच औरंगजेबाची कबर असलेली जागा कोणाची यावरून देखील वाद सुरू आहे. याबाबत स्वत:ला मुघलांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे.

याकूब हबीबुद्दीन टुसी हे स्वतःला शेवटचे मुघल बादशहा शाह जाफर यांच्या सहाव्या पिढीतील असल्याचे सांगतात. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'माझे पूर्वज औरंगजेबाची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही अत्यंत साधी कबर आहे. औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मेले.काही दिवसांपासून ही कबर उखडण्याची मागणी होत आहे.'

'भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. औरंगजेबाच्या कबरची मी संरक्षक आहे. माझी राष्ट्रपतींना विनंती आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी या कबरीचे संरक्षण करावे.', असे याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी म्हटले आहे.

'औरंगजेबाची कबर असलेल्या जागेविषयी, प्राॅपर्टीविषयी वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र, ही जागा भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली असून ती वक्फ बोर्डाची प्राॅपर्टी आहे. आहे. काही लोक इतिहासाची मोडतोड करत आहे आणि दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत हे सरकारने हाणून पाडले पाहिजेत', असे देखील याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी म्हटले आहे.

खुलताबादचे नामांतरण होणार

औरंगजेबाची कबर ज्या खुलताबादमध्ये आहे त्या खुलताबादचे नामांकरण करू, असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. शिरसाट म्हटले की, खुलताबादचे नाव रत्नापूर होते मात्र त्याचे नामांतर करण्यात आले. आता सरकार म्हणून आम्ही मुघल काळात नाव दिलेल्या सर्व गावांची नावं बदलणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT