Pune BJP controversy: ताई, माध्यमांवर नाहीतर बैठकीत बोला; दीनानाथ मंगेशकर आंदोलनावरून भाजपमध्ये वादाची ठिणगी ?

Dinanath Mangeshkar protest News : भाजपच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली.या आंदोलनानंतर भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचा समोर आले आहे.
Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Dheeraj Ghate, Medha Kulkarni Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. यानंतर विविध संघटनांनी आणि पक्षांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलना केली. भाजपच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली.

या आंदोलनानंतर भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचा समोर आले आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भूमिका योग्यच असल्याचे म्हटले आहे.

याबाबत खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे. या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत. दिल्लीतून अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली.

Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Deenanath Mangeshkar Hospital Tax : 48 तासांत मंगेशकर रुग्णालयाचे 27 कोटी वसूल करा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'नाहीतर मी आंदोलनाला बसेल'

पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखा‌द्या व्यक्तीचे एखाद्‌या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे.

Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Deenanath Mangeshkar Hospital : 'वा रे, वा' कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असणाराच चौकशी समितीचा अध्यक्ष? मनसेने धाडलं मुख्यमंत्र्यांना पत्र

या पत्रावर धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धीरज घाटे म्हणाले, 'असे कोणतंही पत्र माझ्यापर्यंत आलेले नाही. ते मी वाचलेले नाही. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली. त्यामुळे जे पत्र मला मिळाले नाही, जे पत्र मी वाचलं नाही, त्याबाबत अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.'

Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Devendra Fadnavis: भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली मोठी जबाबदारी; 'त्या' दोन चिमुकल्या मुलींचा उपचार..

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर जी प्रतिक्रिया आली ती स्वाभाविक होती. या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी आणि पक्षांनी आंदोलने केली. भाजपच्या महिला मोर्चाने केलेले आंदोलन देखील स्वाभाविक प्रतिक्रिया होती. त्या आंदोलनात काही गैर नव्हते.

Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Devendra Fadnavis : पुण्यात पाऊल ठेवताच सीएम फडणवीसांनी आंदोलकांना ठणकावले; म्हणाले, 'आता बस झालं....'

एका महिले संदर्भात ही घटना घडली असल्याने महिलांचे नेतृत्व करणाऱ्या आमच्या पक्षाच्या महिला मोर्चाच्या हर्षदा फरांदे आणि त्यांच्या टीमने केलेल्या आंदोलन स्वाभाविक होते. त्यात काही चुकीचे होते, असे मला वाटत नाही. या प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील योग्य ती भूमिका घेतली आहे. मी देखील भाजपचा शहर अध्यक्ष म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी बोललो आहे. यापूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे चांगले उपचार झालेले आहेत. रुग्णालयाने चांगले काम देखील केलेले आहे. मात्र, ही झालेली घटना ही दुर्दैवी असल्याने त्या विरोधात निषेध करणं चुकीचे नसल्याचे धीरज घाटे यांनी सांगितले.

Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Uddhav Thackeray : 'वक्फ'चा पहिला फटका महाविकास आघाडीला; उद्धव ठाकरे सोडणार काँग्रेसची साथ?

खासदार कुलकर्णी यांनी पाठवलेले पत्र हे माध्यमांमार्फत मला समजले. आमच्या पक्षाची एक चौकट आहे. पक्षाचे स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, पुण्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करणारी चार जणांची टीम आहे. खासदार आमदार, मंत्री अशी सर्वच लोक पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्रित बसून आपले काही मत असेल तर ते बैठकीमध्ये मांडले पाहिजे. असे माध्यमांमध्ये एखाद्या गोष्टीवर रियाक्ट होणे आणि त्याची चर्चा होणे हे सोयीचे नसल्याचे धीरज घाटे यांनी सांगितले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Dheeraj Ghate, Medha Kulkarni
Ram Shinde BJP : प्रा. राम शिंदे सभापतीपदाचं मुख्यमंत्र्यांना 'रिटर्न गिफ्ट' देणार; राजकीय भूकंप घडवत रोहित पवारांना होम ग्राऊंडवर झटका?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com