Prithviraj Chavan Sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan : महायुती भाजपविरोधात नकारात्मक वातावरण; राज्यात 'हा' प्रयोग नक्की होणार, पृथ्वीबाबांचा दावा

Prithviraj Chavan big claim regarding elections in the state : राज्यात महायुती भाजप सरकारविरोधात नकारात्मक वातावरण आहे. हे वातावरण निवळेपर्यंत राज्यात मोठा राजकीय प्रयोग होणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात महायुती भाजपविरुद्ध नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी महायुती भाजपची धडपड सुरू आहे.

त्यामुळे राज्यातील निवडणुका वेळेवर होणार नाहीत. नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राज्यात महायुती भाजप सरकारविरोधात प्रचंड रोष असल्याचे काँग्रेस (Congress) नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीतील जनतेचा तो रोष जाणवला. आता हा रोष महायुती सरकारविरोधात नकारात्मकतेत तयार झाला आहे. बदलापूरची घटना, सिंधुदुर्ग इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा, दडपशाही, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्यांवर राज्यभरात संताप आहे. गेल्या 100 वर्षात देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरात उलट-सुलट चर्चा आहे, असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांचे सर्व्हे सुरू आहे. केंद्रीय संस्थाकडून देखील सर्व्हे सुरू आहेत. यात महाविकास आघाडीला राज्यात 180 जागा मिळतील, असे सर्व्हेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि महायुती भाजप (BJP) सरकारविरोधात तयार झालेले नकारात्मक वातावरण शांत करून घ्यायचे, असे नियोजन आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपते. हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबरला संपते. तसेच झारखंड विधानसभेची मुदत 4 जानेवारीला संपते. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर कालवधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुकी घेतल्या जात नाही, असे कारण सांगितले जात आहे. यातून निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. हरियाणाची निवडणूक जाहीर केली. परंतु महाराष्ट्राची नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT