Sheikh Hasina : शेख हसीना यांना लवकरच भारत सोडावा लागणार ; बांगलादेशात आणखी गुन्हे दाखल!

Cases filed against Sheikh Hasina : शेख हसीना आणि त्यांच्या माजी कॅबिनेट सहकाऱ्यांविरोधात हत्येचे किमान चार आणखी गुन्हे दाखल केले गेले आहेत.
Sheikh Hasina Resigns and left Bangladesh
Sheikh Hasina Resigns and left Bangladesh Sarkarnama
Published on
Updated on

Sheikh Hasina will have to leave India : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या माजी कॅबिनेट सहकाऱ्यांविरोधात हत्येचे किमान चार आणखी गुन्हे दाखल केले गेले आहेत. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार ही बातमी समोर आली आहे. शिवाय बांगलादेशने त्यांचा पासपोर्टही रद्द करणार असल्याचे सांगितल्याने, आता भारतातील त्यांच्या राहण्याचे दिवस संपत आले असल्याचे दिसून येत आहे.

एका वृत्तावाहिनीनुसार, वर्ष २०१०मध्ये बांगलादेश रायफल्स(बीडीआर)चे एक आधिकारी अब्दुर रहीम यांच्या मृत्यू प्रकरणात शेख हसीना(Sheikh Hasina), बांगलादेश बॉर्डर गार्ड फोर्सचे महासंचालक अझीद अहमद आणि अन्य ११ जणांना २०१०मध्ये बांगलादेश रायफल्सचे अधिकारी अब्दुर रहीम यांच्या मृत्यूप्रकरणी रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sheikh Hasina Resigns and left Bangladesh
Shaikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार; 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

१८ जुलै रोजी विद्यार्थी आंदोलनादरम्यान मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी हसीना आणि अन्य ४८ जणांविरोधात आणखी एक खुनाचा गुन्हा दाखल करण्या आला आहे.

याशिवाय बांगलादेशने(Bangladesh) शेख हसीना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्टही रद्द करणार असल्याचे सांगितल्याने आता त्यांचं भारतातील काउंटडाउन सुरू आहे. कारण, शेख हसीना यांच्याकडे अन्य दुसरा कोणताही पासपोर्ट नाही.

Sheikh Hasina Resigns and left Bangladesh
Sheikh Hasina and America : बांगलादेशचे सरकार पाडण्यामागे कुणाचा हात? ; शेख हसीना यांच्या आरोपांना अमेरिकेने दिलं उत्तर, म्हटलं...

बांगलादेशच्या गृहमंत्रालयाच्या सुरक्षा सेवा विभागाने म्हटले आहे की, शेख हसीना, त्यांचे सल्लागार, माजी मंत्रिमंडळ सदस्य आणि नुकतीच विसर्जित झालेल्या बाराव्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट त्वरीत रद्दे केले जातील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com