Prithviraj Chavan Sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan Epstein File India: पृथ्वीराज चव्हाणांचा फुसका बार, एपस्टीन फाईल्स उघडली पण 'तो' बॉम्ब फुटलाच नाही

Prithviraj Chavan statement on Epstein files Fail : एपस्टीन फाईल्स उघडूनही राजकीय भूकंप झाला नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामागची खरी राजकीय कारणे जाणून घ्या.

Rashmi Mane

Epstein files political impact in India : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जेफ्री एपस्टीन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रे ‘एपस्टीन फाईल्स’ (Epstein File) आज खुली होणार होती. या फाईल्समधून जगाला हादरवणारे खुलासे होतील आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या राजकारणावरही होईल, असा दावा चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा रंगली होती.

19 डिसेंबर उजाडला, पण अपेक्षेप्रमाणे कोणताही मोठा किंवा भारताशी थेट संबंधित खुलासा समोर आला नाही. ना भारतीय राजकारणात भूकंप झाला, ना एखादी धक्कादायक माहिती बाहेर आली. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांचा दावा फसला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमधील डेमोक्रॅट्सकडून जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधून काही नवे फोटो जाहीर करण्यात आले. या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, प्रसिद्ध विचारवंत नोम चॉम्स्की आणि माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासोबतचे फोटो समोर आले. या फोटोंचा उद्देश एपस्टीनचे प्रभावशाली लोकांशी असलेले संबंध दाखवणे हा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या फोटोंमधून कोणावरही थेट गुन्हेगारी आरोप सिद्ध होत नाहीत, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

पस्टीन फाईल्स म्हणजे नेमकं काय?

एपस्टीन फाईल म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. एपस्टीन फाईल्स म्हणजे जेफ्री एपस्टीन आणि त्याच्या कथित सेक्स ट्रॅफिकिंग नेटवर्कशी संबंधित सरकारी कागदपत्रांचा संच. यामध्ये न्यायालयीन नोंदी, साक्षीदारांचे जबाब, विमानप्रवासाच्या याद्या, फोटो आणि आर्थिक व्यवहारांची माहिती असू शकते. मात्र पीडितांची ओळख आणि संवेदनशील माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की, या फाईल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे आहेत आणि त्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलू शकतो. नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधान होईल, असा तर्कही त्यांनी मांडला होता. मात्र सध्या तरी या दाव्यांना कोणताही ठोस आधार मिळालेला नाही. काही माध्यमांमध्ये भारतीय नेत्यांची नावे केवळ संदर्भ म्हणून घेतली गेली आहेत, पण कोणताही थेट पुरावा किंवा ठाम आरोप समोर आलेला नाही.

एकूणच, एपस्टीन फाईल्समुळे भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असा जो अंदाज वर्तवला जात होता, तो सध्या तरी फसलेला दिसतो. त्यामुळे हा सारा प्रकार चर्चेपुरताच मर्यादित राहिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT