Geeta Jain | Rahul Narwekar | Pratap Sarnaik | Tanaji Sawant | Deepak Kesarkar sarkarnama
महाराष्ट्र

Priyanka Chaturvedi : राहुल नार्वेकरांची संपत्ती 38 कोटीहून 129 कोटी झाली; सात जणांची नावं घेत ठाकरेंच्या वाघिणीने हिशोबच मांडला

Rahul Narwekar Wealth Increase: गीता जैन यांची संपत्ती 2019 मध्ये 70.44 कोटी होती. ती 2014 मध्ये 392.30 कोटी इतकी आहे. तर, भाजप आमदार पराग शाह यांची संपत्ती 2019 मध्ये 500.62 कोटी होती.

Roshan More

Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्राद्वारे नेत्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये 2019 च्या तुलनेत 50 ते 100 टक्के संपत्तीची वाढ झालेल्या भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांची नावे सोशल मीडियावरून जाहीर करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी निशाणा साधला आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी सात नेत्यांची नावे ट्विट केली आहेत. यामध्ये पराग शाह, गीता जैन, राहुल नार्वेकर, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, दीपक केसरकर, धनजंय मुंडे यांच्या समावेश आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये गीता जैन यांची संपत्ती 2019 मध्ये 70.44 कोटी होती. ती 2014 मध्ये 392.30 कोटी इतकी आहे. तर, भाजप आमदार पराग शाह यांची संपत्ती 2019 मध्ये 500.62 कोटी होती ती 2024 मध्ये 3383.06 कोटी इतकी आहे, असे म्हटले आहे.

राहुल नार्वेकर यांची संपत्ती किती?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील प्रियांका चतुर्वेदी यांनी निशाणा साधला आहे. राहुल नार्वेकर यांची 2019 मध्ये संपत्ती 38.09 इतकी होती. ती 2024 मध्ये 129.81 कोटी इतकी आहे. तर, प्रताप सरनाईक यांची संपत्ती 2019 मध्ये 143.97 कोटी होती. ती 2024 मध्ये 332.32 कोटी आहे.

गद्दार गँगचे भाग

गद्दार गँगचे भाग असलेले असा उल्लेख प्रताप सरनाईक, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचा प्रियांक चतुर्वेदी यांनी केला आहे. तानाजी सावंत यांची संपत्ती 2019 ला 194.5 कोटी होती ती 2024 ला 218.1 कोटी आहे. दीपक केसरकर यांची संपत्ती 59.70 कोटी होती ती 2024 ला 98.50 कोटी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले धनंजय मुंडे यांचा देखील उल्लेख करत त्यांची संपत्ती 81.3 टक्के वाढली असल्याचे प्रियांक चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT