Kolhapur News, 01 Nov : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उंची फार मोठी आहे. त्यांच्यावर आरोप आणि टीका करण्याचे धाडस सतेज पाटलांनी करू नये. महायुती विकासकामांच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरं जात असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे.
काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच त्यांच्यावर उमेदवार बदलण्याची वेळ आली, असा टोला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, आमदार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांना काँग्रेस नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्यावर अन्याय केला. म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून पद दिलं. महिला सबलीकरणासाठी त्या काम करणार आहेत.
तसंच पुढील काळात त्यांना योग्य तो न्याय देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. पण त्यांना शिवसेनेमध्ये (Shivsena) आणण्यात माझा काहीही संबंध नाही. महिनाभरापूर्वी त्यांना सांगण्यात आलं होतं की, उमेदवारी मिळणार नाही. त्यांनी ते मान्य केलं आणि सामान्य कार्यकर्ते राजेश लाटकर यांचं नाव सुचवलं.
पण ऐनवेळी त्यांनी उमेदवार बदलला. बदललेल्या निर्णयात त्यांना विचारत घेतले नाही, असा आरोप यावेळी क्षीरसागर यांनी केला. तर काँग्रेस (Congress) नेत्यांनी सातत्याने महायुतीवर आरोप केले आहेत. त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी उमेदवार बदलला. आता माघार घेण्यापर्यंत उमेदवारी राहील की नाही शंका आहे, असा टोलाही त्यांनी पाटील यांना लगावला.
पुढील काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश होतील. सतेज पाटील यांची कीव येते, दोन वेळा मंत्री झाले. शाहू फुले यांचे नाव घेऊन त्यांनी राजकारण केलं, मंत्री झाले पण त्यांनी कोल्हापूरचा विकास केला नाही. महायुतीने केलेलं विकासकाम मोठं आहे. त्यामुळेच त्यांना पराभव दिसत आहे, असा हल्लाबोल क्षीरसागर यांनी सतेज पाटलांवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.